शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

कारखानदार जोमात, ऊस उत्पादक कोमात; थकीत बिलाने शेतकऱ्यांची कोंडी

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 17:58 IST

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन ...

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आतापर्यंत २२ लाख टन उसाचे गाळप करून २१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना उसाचे बिलच दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याचे चित्र पाहून कारखानदार जोमात, ऊसउत्पादक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १९ पैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. यापैकी राजारामबापू साखर कारखान्याच्या तीन शाखांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीही संबंधित कारखान्यांनी उसाचे पहिले बिल शेतकऱ्यांना दिले नाहीत. साखर कारखान्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, बँकांचे हप्तेही थांबले आहेत. यामुळे कारखानदारांनी त्वरित उसाची बिले द्यावीत, अशी मागणीही शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांमधून होत आहे.

कायद्याचाही धाक राहिला नाही की काय?२००८-०९ च्या एफआरपी (रास्त व उचित दर) कायद्यानुसार तुटलेल्या उसाचे चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याची हमी आहे. जर साखर कारखानदारांनी वेळेत उसाचे बिल न दिल्यास १५ टक्के व्याज देण्याची तरतूदही आहे. या कायद्याचाही आता साखर कारखानदारांना धाक राहिला नाही की काय, असा प्रश्नही ऊसउत्पादकांनी उपस्थित केला आहे.

बिल न दिल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रार : संदीप राजोबासाखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून १४ दिवसांत उसाची बिले शेतकऱ्यांना दिली पाहिजेत, असा कायदा आहे. हा कायदाच साखर कारखानदार पाळत नसतील तर त्यांच्याविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार करून न्याय मागणार आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.

बिल वेळेवर न देणाऱ्या कारखान्यावर आंदोलन : सुनील फराटेसाखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही अनेक कारखान्यांनी उसाची बिले काढली नाहीत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे, त्या कारखान्यासमोर शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी