लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव हातावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:33+5:302021-06-29T04:18:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या शैक्षणिक वर्षात कोरोना व लॉकडाऊनमुळे महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज थंडावले, प्रशासकीय कामकाज मात्र सुरूच ...

Even in lockdown, student scholarship proposals are out of hand | लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव हातावेगळे

लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव हातावेगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या शैक्षणिक वर्षात कोरोना व लॉकडाऊनमुळे महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज थंडावले, प्रशासकीय कामकाज मात्र सुरूच राहिले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळेत निकाली निघाले आहेत. आजमितीस फक्त ४६५ प्रस्ताव निर्णयाधीन आहेत.

विद्यार्थ्यांसाठी ही बाब मोठा दिलासा देणारी ठरली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. विशेषत: अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा मोठा आधार असतो. शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने शिष्यवृत्ती आधार देणारी ठरते. गेले वर्षभर महाविद्यालयांत शैक्षणिक कामकाज बंद होते, त्यामुळे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव रखडण्याची भीती होती; पण महाविद्यालयांनी प्रशासकीय कामकाज सुरूच ठेवले. सामाजिक न्याय विभागानेही शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळेत निकाली काढले. सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

कोट

लॉकडाऊनमुळे ऑनलाइन प्रस्ताव सादर केले

कॉलेजमध्ये जाता आले नाही; पण ऑनलाइन स्वरूपात शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केला. लॉकडाऊनमुळे कॉलेजनेही सहकार्य केले. प्रस्ताव मंजूर झाल्याचा मेसेजही मिळाला. कोरोना व लॉकडाऊन असले तरी शिष्यवृत्ती प्रक्रियेत अडथळा आला नाही. काही त्रुटी होत्या; पण त्या ऑनलाइन स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करून निकाली काढल्या.

- रोहित चंदनशिवे, विद्यार्थी, कवठेमहांकाळ

अभियांत्रिकी शिक्षणक्रमासाठी शिष्यवृत्ती गरजेची होती. जानेवारीपासून लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पूर्ण केले. आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन व प्रसंगी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन सादर केली. कोणतीही त्रुटी न निघता प्रस्ताव मंजूरही झाला.

- प्रसेन्नजित सोनवणे, विद्यार्थी, मिरज

कोट

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अजूनही संधी आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाडीबीटी प्रणालीअंतर्गत शिष्यवृत्ती अर्जांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात शिष्यवृत्ती, फ्रीशिप, निर्वाह भत्ता या योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटीच्या पोर्टलवर अपलोड करावीत. अडचणीसाठी महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाशी संपर्क साधावा.

- संभाजी पोवार, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग

पॉइंटर्स

एससी प्रवर्ग

ऑनलाइन सादर झालेले एकूण अर्ज ७,९८१

समाजकल्याण विभागाने निकाली काढले ७,८६६

पडताळणीसाठी प्रलंबित अर्ज ११५

व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्ग

ऑनलाइन सादर झालेले एकूण अर्ज १४,४९९

समाजकल्याण विभागाने निकाली काढले १४,१४९

पडताळणीसाठी प्रलंबित अर्ज ३५०

Web Title: Even in lockdown, student scholarship proposals are out of hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.