शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- ताकारी योजना: लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य पाणी वापर संस्थांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:32 IST

'राजकारणाचा शिरकाव होण्याची भीती :पारदर्शक कारभाराची आशा'

प्रताप महाडिककडेगाव : ताकारी  योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन केली जात आहे. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य आता पाणी वापर संस्थांच्या हाती जात आहे. पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणे हाच यामागचा उद्देश आहे. या पाणी वापर संस्थामध्ये राजकारणाचा शिरकाव होण्याची  भिती आहे. मात्र तरीही पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळ निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जात असल्याने येथे बळीराजाला मतदारराजा प्रमाणे महत्त्व राहणार आहे. पाणी वापर संस्थांना योजनेकडून धनमापन पद्धतीने मोजून दिले जाणार आहे.यामुळे समन्यायी  पाणी वितरण होणार आहे.सद्यस्थितीत योजनेची पाणीपट्टी एकरी ७ हजार ३०० रुपये आहे.मात्र पाणी वापर संस्था याहूनही कमी दराने पाणी देतील.

७३ पाणी वापर संस्थांची स्थापना  ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात  ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना केली आहे. यामधील  ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे.यापैकी ८ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया  झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया  झाली आहे.

समृद्ध शेती हीच योजनेची यशोगाथा कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते आणि ताकारी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून हा कणा अधिक ताठ आणि सशक्त होत आहे. लाभक्षेत्रातील ७१ गावात   सिंचन सुविधेमुळे शेती समृद्ध झाली आहे. जीवनमान उंचावल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.उद्योग व्यवसायांची भरभराट झाली आहे.शेतकऱ्यांची मुले शहरांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.तरुणाई नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती व शेती पूरक व्यवसाय  करीत आहे.उस,आद्रक व हळद उत्पादनात अव्वल ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात  सुमारे १५ लाख मे.टन उसाचे  उत्पादन निघत आहे.यामुळेच साखर कारखाने उभा राहिले व  रोजगार निर्मिती झाली आहे.याशिवाय आले (आद्रक) व हळद  उत्पादन मोठ्या  प्रमाणावर घेतले जाते.मागील दोन वर्षात आद्रक (आले)  पिकाला उच्चांकी दर मिळाला.यामुळे कित्येक शेतकरी कोट्याधीश झाले आहेत.देशी विदेशी फळ भाजीपाला पिकांची रेलचेलताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात द्राक्षे, आंबा, केळी, डाळिंब, लिंबू, सिताफळ यासारख्या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर  झाली आहे.याशिवाय  ड्रॅगन फ्रूट, झुकिनी, रेड कॅबेज इ. विदेशी फळे व भाजीपाला पिकवत आहेत.

प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतरची दिशा ताकारी योजनेच्या प्रकल्पाची कामे पूर्णत्वाच्या अंतीम टप्यात आहेत.याशिवाय बंदीस्त नलिकांची व लाभक्षेत्र विकासाची कामे वर्षभरात पुर्ण होतील. सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे  सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.पाणी वापर संस्थाना सिंचन व्यवस्थापन, पाणी आवर्तन नियोजन,पाणी वितरण, पाणी पट्टी आकारणी व वसूली  इ. बाबत सर्वाधिकार असणार आहेत.तात्पर्य,ताकारी योजना शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यासाठी राबवलेली यशस्वी योजना ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी