ख्रिश्चन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST2020-12-23T04:23:55+5:302020-12-23T04:23:55+5:30

इस्लामपूर : राज्याच्या विविध भागांत गरीब अवस्थेत जगणाऱ्या आणि संघटित होऊन संघर्षाच्या रस्त्यावर भीतीपोटी न येणाऱ्या ख्रिश्चन समाजासाठी शासनाने ...

Establish an independent consortium for the Christian community | ख्रिश्चन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा

ख्रिश्चन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा

इस्लामपूर : राज्याच्या विविध भागांत गरीब अवस्थेत जगणाऱ्या आणि संघटित होऊन संघर्षाच्या रस्त्यावर भीतीपोटी न येणाऱ्या ख्रिश्चन समाजासाठी शासनाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केली.

या मागणीसाठी नाताळच्या पूर्वसंध्येला २४ डिसेंबरला राज्यभरात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येथे झालेल्या पत्रकार बैठकीत प्रा. सकटे म्हणाले, देशात आणि राज्यात सगळीकडे हा समाज आहे. या समाजाला नोकरीत संधी नाही. धर्म बदलला म्हणून त्यांचे सामाजिक स्थान बदललेले नाही. ते आजही मजूर म्हणून काम करतात. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळावे, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर जीवन जगता यावे, यासाठी शासनाने हे महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे.

यावेळी शंकर महापुरे, उत्तम चांदणे, संतोष चांदणे, रवी बल्लाळ, सोनाली कोळी, बापूराव बडेकर, अनिल आवळे, दीपक मिसाळ, डी. जे. मस्के, सुनील वारे उपस्थित होते.

Web Title: Establish an independent consortium for the Christian community