शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सांगलीत पोलिस ठाण्यातून दोन आरोपींचे पलायन, पोलिसांच्या हातावर तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:02 PM

कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६) व अमोल सुनील भंडारे (वय २३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोन संशयित आरोपींनी सांगली शहर पोलिस ठाण्यातून पलायन केले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देकोठडी मिळाली असताना बाहेर बसविलेसांगली शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदीपोलिसांनी बेदम चोप दिल्याची चर्चा

सांगली ,दि. ०७ : कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६) व अमोल सुनील भंडारे (वय २३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोन संशयित आरोपींनी सांगली शहर पोलिस ठाण्यातून पलायन केले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

गायकवाड मुंबईत नोकरीस आहेत. रविवारी पहाटे ते नांदणी (ता. शिरोळ) येथे सासरवाडीला जाण्यासाठी एसटीने सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर आले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना चल भावा, तूला नांदणीला सोडतो, असे म्हणून दुचाकीवर बसविले. त्यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ नेऊन चाकूचा धाक दाखवून दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला होता.

शहर पोलिसांनी या घटनेचा २४ तासात छडा लाऊन अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी दुपारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

रात्री उशिरा या दोघांना चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते. याची संधी साधून हे दोघेही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले.

रात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे आरोपींची कोठडी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे दोन्ही आरोपी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी विचारणा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर ड्युटीवरील पोलिसांना घाम फुटला. संशयितांच्या शोधासाठी शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. पण सुगावा लागला नाही.

मारहाणीची चर्चाअटकेतील दोन्ही संशयितांना पोलिसांनी बेदम चोप दिला. त्यामुळे एकजण बेशुद्ध पडला. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी पोलिसांनी दोघांनाही वाऱ्याला पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. त्यावेळी पोलिस पुन्हा मारतील, या भितीने दोघेही पळून गेल्याची चर्चा आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस