शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

चौदाशे किमी सायकल प्रवासात आष्ट्यातील युवकांचा पर्यावरण जागर, भिलवडी-आष्टा-कन्याकुमारी चौदा जणांची शांतता रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:39 IST

वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास

सुरेंद्र शिराळकरआष्टा : आष्टा (ता.वाळवा) येथील युवकांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. सुमारे १४ युवक १४०० किलोमीटर सायकलवरून प्रवास करीत शांतता, व्यसनमुक्ती तसेच बेटी पढाओ बेटी बचाओ तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देत आहेत.आष्टा शहरातील अनेक युवक सायकलींवरून नियमितपणे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर व्यायाम करतात. या सायकलप्रेमी युवकांपैकी अमोल पाटील, अमोल चौगुले, प्रकाश उर्फ छोटू लिगाडे, परशुराम मदने, लक्ष्मण माळी, सचिन चौगुले, शुभम सरडे, संदीप खोत (मिरजवाडी), सुबोध वाळवेकर, बाहुबली चौगुले (भिलवडी), सुहास सूर्यवंशी (पलूस), महावीर वसगडेकर (मिरज), जितेंद्र शेट्टी (अंकली), दीपक पाटील, सुहास सूर्यवंशी यांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास करण्याचे निश्चित केले. त्यांना उद्योगपती गिरीश चितळे, राजू चौगुले, अमोल पाटील, डॉ. अरुण सरडे, निनाद माळी यांचे सहकार्य लाभले.आष्टा येथील अंबाबाई मंदिरानजीक सांगली जिल्हा नशाबंदी मंडळाचे संघटक समीर गायकवाड, डॉ. अरुण सरडे, शंकर मोहिते, रवींद्र चौगुले, निनाद माळी, प्रदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पहिल्या दिवशी सुमारे १५५ किमी व दुसऱ्या दिवशी १४५ किमी प्रवास केला. हे युवक कन्याकुमारीपर्यंत चौदाशे किलोमीटर प्रवास करणार आहेत. या प्रवासात सामाजिक शांततेचा संदेश देण्याबरोबर बेटी पढाओ, बेटी बचाओ, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सायकलप्रेमी युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे.वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवासडॉ अरुण सरडे यांनी वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास सुरू ठेवला असून, त्यांनी नुकताच सप्टेंबरमध्ये जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आदर्श घालून दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCyclingसायकलिंगenvironmentपर्यावरण