बेदाणा वॉशिंगमुळे पर्यावरण धोक्यात

By Admin | Updated: September 11, 2015 23:14 IST2015-09-11T23:14:10+5:302015-09-11T23:14:10+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यात रसायनमिश्रित घटक; पाण्याचे स्रोत प्रदूषित

Environmental hazard by currant washing | बेदाणा वॉशिंगमुळे पर्यावरण धोक्यात

बेदाणा वॉशिंगमुळे पर्यावरण धोक्यात

 प्रदीप पोतदार -कवठेएकंद ते तासगाव मुख्य मार्गावरील बेदाणा वॉशिंगमधील टाकाऊ सांडपाणी, रासायनिक घटकांमुळे येथील पर्यावरण धोकादायक बनले आहे. बेदाणा वॉशिंग उद्योगामधील रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरवले गेल्याने परिसरातील पाण्याचे स्रोत आणि शेतजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेती आणि पाण्याबरोबरच पशु, पक्षी, प्राण्यांचाही वावर या परिसरात कमी झाला आहे.
बेदाण्याला चमकवण्याच्या या व्यवसायामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर काजवे चमकू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी करुनसुद्धा बड्या उद्योजकांकडून मनमानी सुरू आहे. एकीकडे द्राक्ष उत्पादनाची आणि बेदाणा बाजारपेठेची देशभरात तासगावची ख्याती असली तरी, पर्यावरण संवर्धनाबाबत मात्र उदासीनताच दिसून येत आहे.
कवठेएकंद-तासगाव मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक बेदाणा वॉशिंगचे लहान-मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेदाण्याला चमकवण्यासाठी तो वॉशिंग केला जातो. यासाठी अनेक रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्या वापरानंतर वॉशिंग उद्योगातून रसायनयुक्त पाणी बाहेर सोडले जाते किंवा प्रकल्पाच्या आतच खुल्या जागेत मुरवले जाते. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात असे पाणी ओढ्या, नाल्यात सोडल्यामुळे परिसरातील पाण्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
बेदाणा उद्योगातील सांडपाण्यासह रासायनिक घटकांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली जात नाही. या उद्योगातील गंधकासारखे घटक, रासायनिकचे जळके पदार्थ स्त्याकडेला, नदी, नाल्यात टाकून दिले जातात. याचा विपरित परिणाम होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील पाण्याच्या स्रोतांमधून हे रसायनमिश्रित पाणी मिसळल्यामुळे ते विषारी बनले आहे. याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.

बेदाणा वॉशिंगमुळे पर्यावरण धोक्यात
प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यात रसायनमिश्रित घटक; पाण्याचे स्रोत प्रदूषित
प्रदीप पोतदार ल्ल कवठेएकंद
कवठेएकंद ते तासगाव मुख्य मार्गावरील बेदाणा वॉशिंगमधील टाकाऊ सांडपाणी, रासायनिक घटकांमुळे येथील पर्यावरण धोकादायक बनले आहे. बेदाणा वॉशिंग उद्योगामधील रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरवले गेल्याने परिसरातील पाण्याचे स्रोत आणि शेतजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेती आणि पाण्याबरोबरच पशु, पक्षी, प्राण्यांचाही वावर या परिसरात कमी झाला आहे.
बेदाण्याला चमकवण्याच्या या व्यवसायामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर काजवे चमकू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी करुनसुद्धा बड्या उद्योजकांकडून मनमानी सुरू आहे. एकीकडे द्राक्ष उत्पादनाची आणि बेदाणा बाजारपेठेची देशभरात तासगावची ख्याती असली तरी, पर्यावरण संवर्धनाबाबत मात्र उदासीनताच दिसून येत आहे.
कवठेएकंद-तासगाव मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक बेदाणा वॉशिंगचे लहान-मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेदाण्याला चमकवण्यासाठी तो वॉशिंग केला जातो. यासाठी अनेक रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्या वापरानंतर वॉशिंग उद्योगातून रसायनयुक्त पाणी बाहेर सोडले जाते किंवा प्रकल्पाच्या आतच खुल्या जागेत मुरवले जाते. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात असे पाणी ओढ्या, नाल्यात सोडल्यामुळे परिसरातील पाण्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
बेदाणा उद्योगातील सांडपाण्यासह रासायनिक घटकांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली जात नाही. या उद्योगातील गंधकासारखे घटक, रासायनिकचे जळके पदार्थ स्त्याकडेला, नदी, नाल्यात टाकून दिले जातात. याचा विपरित परिणाम होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील पाण्याच्या स्रोतांमधून हे रसायनमिश्रित पाणी मिसळल्यामुळे ते विषारी बनले आहे. याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
तासगाव-कवठेएकंद मार्गावर तालुक्याचे कृषी कार्यालय आहे. अवघ्या हाकेच्या अंतरापासून अशा उद्योगांचे सर्व उद्योग सुरु असतात. मात्र कृषी कार्यालयाकडून याबाबतची साधी तक्रारसुद्धा केली गेली नाही. अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात वॉशिंग उद्योगातील जळके गंधक गाड्या भरून ओतले जाते. पण याकडे कोणाचेच लक्ष नसणे किंवा कृषी खात्याच्या नजरेत ही बाब न येणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. परिसरातील रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या प्रकल्पांचा प्रश्न दरवर्षीच ऐरणीवर येतो. प्रदूषणाचे गंभीर परिणाम नव्याने मांडण्याची गरज नाही. पण अशा रसायनमिश्रित दूषित पाण्यामुळे जनावरांचे आणि पशु-पक्ष्यांचे जीवनही धोक्यात येत आहे. अनेक वर्षांची साक्ष देणारी झाडे प्रदूषणामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे सारे अक्षरश: डोळ्यासमोर घडत असताना कृषी विभाग नेमके काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Environmental hazard by currant washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.