"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:13 PM2021-02-22T18:13:55+5:302021-02-22T18:17:12+5:30

literature SangliNews- "एन्काऊंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा! माणूस वाचला पाहिजे, समतेचा मार्ग टिकवण्यासाठी" यासह अनेक बहारदार काव्यांनी प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची मैफील सांगलीत रंगली.

"Encounter .. not of man, of mentality ... | "एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा...

"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा...

googlenewsNext
ठळक मुद्दे"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा... श्रावस्ती बुद्धीविहारात रंगली 'काव्यमैफिल हृदयमानवाची'

सांगली : "एन्काऊंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा! माणूस वाचला पाहिजे, समतेचा मार्ग टिकवण्यासाठी" यासह अनेक बहारदार काव्यांनी प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची मैफील सांगलीत रंगली.

संजयनगर येथील श्रावस्ती बुद्धविहाराच्यावतीने काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कविता बुद्ध तत्त्वज्ञानाच्या, मानवतेच्या, बाबासाहेबांच्या विचारांच्या, समतेच्या आणि माणुसकीच्या. आदी विषयांवरील बहारदार आणि माणूस जोडणाऱ्या कवितांचं यावेंळी सादरीकरण करण्यात आलं.

'एन्काऊंटर करा' या कवितेने उस्थितांची मन जिंकली. मानवतेच्या वाटेवर चालताना आपला माणूस वाचवून मानसिकता संपवण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले.

"कस्टडी खोला मायबाप हो
आपणच डांबून ठेवलेल्या
प्रकांड पंडितांची
ते आक्रन्दताहेत मुक्याने
बाहेर येण्यासाठी"

यासारख्या कवितेतून महापुरुषांच्या विचारांना मुक्त करून सकल मानवजातीसाठी एकत्रित आलं पाहिजे असं सांगण्यात आलं.
"मधलं बोट
दाखवलं पाहिजे
घोळक्या घोळक्याने
ढेकळातल ढेकळं न कळणाऱ्यांना"

या कवितेतून शेतकरी आंदोलनाला समर्थन तर विरोध करणाऱ्यांवर ताशेरे त्यांनी ओढले.

"राजे,
तुम्हाला कॉपी करू पाहणाऱ्या
वाढलेल्या दाढ्या कुरवळल्या गेल्यात
काही दिवसांपूर्वी मोसमात
तुमच्या मुद्राप्रस्थ गडकिल्ल्यांवर"

या शिवरायांचं समरण करून वाहवत गेलेल्या पिढीला समज देणाऱ्या कवितेतून प्रबोधन करण्यात आले.

'ग्लोबल आंबेडकर', 'माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे', 'ग्रंथालयात जायचं पुस्तकांना घ्यायचं', 'तुझ्यात फक्त दम पाहिजे', 'तू फक्त तू आहेस', 'पुतळे, दहशतवादाचे टेंडर', आदी मेंदूला जाग आणणाऱ्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या. अभ्यासू रसिकांनी यास भरभरुन दाद दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नामदेव कस्तुरे होते. ते म्हणाले समाजाने कलाकारांना जोपासले पाहिजे. सर्वार्थाने त्यांंच्या पाठिशी राहिले पाहिजे. समाजपरिवर्तन शक्य होईल. हृदयमानव अशोक या तरुण कवीच्या कविता म्हणजे वर्तमान समाज सामस्यांवर घाव घालण्याची व त्यातून नवी वाट दाखविण्याची क्षमता असणाऱ्या कविता आहेत.

यावेळी डॉ जगन कराडे, डॉ रविंद्र श्रावस्ती, सुधीर कोलप,  दयानंद कोलप, डॉ सोनिया कस्तुरे आदी उपस्थित होते. प्रा. अशोक भटकर यांनी सूत्रसंचलन केले. चंद्रकांत नागवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर संजीव साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सोनुताई कांबळे , प्रा.अशोक भटकर,अरुण कांबळे, पवन वाघमारे ,दिपक कांबळे आदींनी केले.

Web Title: "Encounter .. not of man, of mentality ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.