शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Sangli- महापुरातला महागोंधळ: पूर नसतानाही कोट्यवधीचा आपत्कालीन खर्च

By अविनाश कोळी | Updated: October 11, 2024 17:58 IST

नियमबाह्य कामांचा कहर : अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल कुठे आहे?

अविनाश कोळीसांगली : तत्कालीन आयुक्तांनी २०१९चा महापूर ओसरल्यानंतर सहा महिन्यांनंतरही आपत्कालीन खर्चाचा सपाटा कायम ठेवला. त्यामुळे सप्टेंबर २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत केली गेलेली सर्व कामेही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. झालेल्या खर्चाचे अंतर्गत लेखापरीक्षण झाल्याची माहितीही सादर केली गेली नाही. बहुतांश कामात नियमांना ठेंगा दाखविण्यात आल्याचे दिसून येते.सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने महापूर व कोरोना काळात केलेली कामे वादग्रस्त ठरली आहेत. २०१९च्या जुलै व ऑगस्ट महिन्यात महापुराने सांगली व मिरज शहरांना कवेत घेतले होते. या काळात आपत्कालीन खर्च अपरिहार्य होता, मात्र १५ ऑगस्टला पूर ओसरल्यानंतर त्यापुढील सर्व कामे रितसर स्थायी समितीच्या मान्यतेने करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने दिलेल्या खर्चाच्या अहवालानुसार डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत पूर नसतानाही आपत्कालीन कामे मंजूर करून त्याची बिलेही अदा करण्यात आली.

महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६७(३) क नुसार आयुक्तांना आपत्कालीन स्थितीत विनानिविदा कामे करता येतात. मात्र, ज्यावेळी अशी स्थिती नसेल तेव्हा रितसर स्थायी समितीच्या मान्यतेने खर्च करायला हवा. या नियमाला ठेंगा दाखवित तत्कालीन आयुक्तांनी सर्रास आपत्कालीन कामे केली. सप्टेंबर व डिसेंबरमध्ये केलेल्या कामांना जानेवारीअखेर स्थायी समितीसमोर अवलोकनार्थ ठेवण्यात आले. त्यामुळे नियमांच्या चिंधड्या उडवून ही कामे केली गेली.

पंधरा दिवसांचा नियम मोडलाआयुक्तांनी केलेला आपत्कालीन खर्च पंधरा दिवसांत स्थायी समितीसमोर अवलोकनार्थ यायला हवा. मात्र, काही प्रकरणात एक वर्ष तर काही प्रकरणात पाच वर्षांनी स्थायी समितीत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे ही सर्व कामे नियमबाह्य ठरू शकतात.

हे घ्या पुरावे नियमबाह्य कामांचे..

  • अतिवृष्टीत बंद पडलेल्या जॅकवेलच्या पंपिंग मशिनरीसाठी ऑइल खरेदी डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात आली.
  • वास्तविक पूर १५ ऑगस्ट २०१९ ला ओसरला होता. या खरेदीला स्थायीची मंजुरी जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आली.
  • पूरस्थितीमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला गेला. मात्र, या खर्चास आयुक्तांची मंजुरी डिसेंबर २०१९ ला तर स्थायीची मंजुरी २ जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आली.
  • महापुरात पीएसी पावडरच्या खरेदीला आयुक्तांची मान्यता जानेवारी २०२० मधील आहे. या काळात पूर नव्हता. त्याच दिवशी स्थायीचीही मान्यता घेतली. तरीही आपत्कालीन खरेदी दाखविली.
टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरfundsनिधी