शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खटले निर्दोष सुटण्यामागील त्रुटी दूर करा, पोलिस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत गृहमंत्र्यांनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:48 IST

सांगलीत पोलिस दलाची गुन्हे आढावा बैठक

सांगली : खटले निर्दोष सुटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलिस ठाणेनिहाय आढावा घ्यावा. यातील त्रुटी दूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या.पोलिस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहूरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, अपर अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. जिल्ह्यामध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे. मालमत्ताविषयक गुन्ह्यांत हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे. अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी.

ते म्हणाले, महिला बेपत्ता होण्यासंदर्भातील गुन्ह्यांत निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा. दाखल गुन्हे, किती महिला परत आल्या, याचे पोलिस ठाणेनिहाय ‘ट्रॅकिंग’ करावे. यासाठी विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा. नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पोलिस दल या यंत्रणा समन्वयाने संभाव्य महापूर परिस्थितीत कामगिरी पार पाडतील, अशी ग्वाही दिली.

अधीक्षक घुगे यांनी पोलिस दलाच्या कामगिरीविषयक सादरीकरण केले. नावीन्यपूर्ण उपक्रम, विशेष कामगिरी, पोलिस दलाचे कल्याणकारी उपक्रम, जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेले उपक्रम आणि आव्हानांची माहिती सादर केली.

टॅग्स :SangliसांगलीHome Ministryगृह मंत्रालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस