शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील अकरा प्राथमिक शाळा शिक्षकांविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:39 IST

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटलेला नाही.

ठळक मुद्देबदल्यांच्या घोळामुळे शिक्षकांच्या जागा रिक्ततात्पुरत्या सोयीवरच शाळांचे कामकाज;आदेश असतानाही दुर्गम भागातच निर्माण झाला मोठा प्रश्न

 सांगली : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने अन्य शाळांतील शिक्षकांची तात्पुरती सोय केली असली तरी, त्याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.

यंदा जिल्ह्यातील २ हजार १६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्याची प्रक्रिया झाली. हे करत असताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा आढावा घेतला, तर १ हजार ६९८ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी ६ हजार ४३१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५ हजार ८०६ शिक्षक कार्यरत आहेत. ७६० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांपैकी सर्वाधिक ३५० शिक्षकांच्या जागा फक्त जत तालुक्यातच रिक्त आहेत. यासह आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील पदेही रिक्त आहेत. ग्रामविकास विभागाने बदली प्रक्रिया राबविताना दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही याच भागातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडल्या आहेत.शिक्षकांसाठी पाठपुरावाजिल्हा परिषदेच्यावतीने रिक्त जागांवर शिक्षक मिळावेत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आॅनलाईन बदली प्रक्रियेतून शिक्षक मिळण्याची व दुर्गम भागातील शाळांची सोय होईल, ही अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याने आता उर्वरित जागांसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षक नसलेल्या ठिकाणी शेजारच्या शाळेतील शिक्षकांना काही काळासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील शून्यशिक्षकी शाळा...जिल्ह्यातील शिक्षकच नसलेल्या अकरा शाळांमध्ये देशमुखवाडी (आटपाडी), जत तालुक्यातील बनाळी, जाडरबोबलाद, मुचंडी, उमदी, वाळकेवाडी, वळसंग, विहापूर (ता. कडेगाव), आरळा (ता. शिराळा), कोरेगाव (ता. वाळवा) या गावांतील शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगलीTeacherशिक्षक