शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पंचायत समिती सभापती निवड २५ फेब्रुवारीला, काँग्रेसच्या पूनम कोळी भाजपच्या पाठिंब्यावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:05 IST

पंचायत समितीत भाजपमध्ये फूट पाडण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे

मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाची २५ फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. तसा आदेश तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी पंचायत समिती प्रशासनास दिला. सदस्यांना निवडीची नोटीस दिली आहे. मूळच्या महाविकास आघाडीच्या व भाजपला पाठिंबा दिलेल्या बिसूरच्या पूनम कोळी या भाजपच्या पाठिंब्यावर सभापतीची निवडणूक लढविणार आहेत. विरोधी महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केली नाही.

सभापती पदाचा सुमन भंडारे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. नवीन सभापती पदाच्या निवडीसाठी तहसीलदार कुंभार यांनी कार्यक्रम जाहीर केला. ही निवड २५ फेब्रुवारीस होणार आहे. गत निवडीत काँग्रेसच्या पूनम कोळी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नरवाडच्या सदस्या सुमन भंडारे यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती.भंडारे यांच्या निवडीवेळी भाजपला पाठिंबा दिलेल्या कोळी यांना सभापती पद देण्याचा शब्द खा. संजयकाका पाटील यांनी दिला होता. यामुळे कोळी यांना संधी देण्यासाठी सुमन भंडारे यांना वीस दिवसांत सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या भाजपच्या पाठिंब्यावर मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या पूनम कोळी सभापती पदाची निवडणूक लढविणार आहेत.

महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष !

पंचायत समितीत भाजपमध्ये फूट पाडण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. सध्या याच बळावर अनिल आमटवणे यांच्याकडे उपसभापती आहे. गत सभापती निवडीत आघाडीने सत्तांतराचीही तयारी केली होती. मात्र, ती यशस्वी झाली नाही. सध्या महाविकास आघाडीत निवडीबाबत हालचाली दिसून येत नसल्या तरी महाविकास आघाडी ऐनवेळी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता लागून आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस