दिलीप पवार यांची अध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:24+5:302021-07-07T04:32:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप गणपती पवार यांची तर सरचिटणीसपदी गांधी ...

दिलीप पवार यांची अध्यक्षपदी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप गणपती पवार यांची तर सरचिटणीसपदी गांधी चौगुले यांची फेरनिवड निवड करण्यात आली. जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत देवाप्पा करांडे, सरचिटणीस गांधी चौगुले, कार्याध्यक्ष नितीन वाघमारे, कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल बिरादार, कोषाध्यक्ष भगवान नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख सिकंदर शेख, तालुका सल्लागार मंडळ सदस्य अशोक घोदे, तालुका उपाध्यक्ष दयानंद गिरगावकर, आमगोंडा पांढरे, शिवाजी महाजन, यल्लाप्पा अभंगे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष शिंदे, सदाशिव गेजगे, तालुका संघटक संजय राठोड यांची निवड केली. बैठकीस फत्तुसो नदाफ, जकाप्पा कोकरे, पिराप्पा ऐवळे, बसवराज यलगार, नामदेव भोसले, मौलाली शेख उपस्थित होते.