वाळवा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:46+5:302021-07-16T04:19:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अशोक खोत पुन्हा शहराध्यक्ष झाले, तर ...

वाळवा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अशोक खोत पुन्हा शहराध्यक्ष झाले, तर सतेज जयवंत पाटील यांच्याकडे युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शहर महिलाध्यक्षपदी स्मिता पवार यांना संधी देण्यात आली. आष्टा शहराच्या अध्यक्षपदी उदय कवठेकर, युवा मोर्चासाठी अरबाज मुजावर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, संजय हवलदार, डॉ. सतीश बापट यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या.
नव्या कार्यकारिणींमध्ये विकास परीट, शरद कुंडले, फारूख इबुशे, मेहबुब चाउस, प्रवीण परीट, भास्कर मोरे, अरुण शिंगण, मुकंद रास्कर, अक्षय कोळेकर, वजीर डाके, तानाजी पाटील, रामभाऊ शेवाळे, रामभाऊ जाधव, स्वप्निल कोरे, अभिजित खडके, अनिल सरदेशमुख, सूरज पाटील, निवास पाटील, शिवाजी माने, श्रीमती विजयमाला पाटील, श्रीदेवी आडमुठे यांची निवड करण्यात आली.