शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

बेडगचा श्रीधर लिंबीकाई आयकरमध्ये सहाय्यक आयुक्तपदाच्या खुर्चीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:48 IST

MPSC exam Sangli : बेडग (ता. मिरज ) येथील डॉ. श्रीधर रावसाहेब लिंबिकाई याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत तब्बल तीनवेळा दांडी उडाली. एकदा तर अवघ्या तीन गुणांनी यशाने हुलकावणी दिली. पण त्याने पाठपुरावा सोडला नाही. अखेर यशाचा एव्हरेस्ट सर केलाच. नुकतीच त्याची आयकर विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली.

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेत यशासाठी आठ वर्षांचा संघर्ष, तीनवेळा दांडी उडालीबेडगचा श्रीधर लिंबीकाई आयकरमध्ये सहाय्यक आयुक्तपदाच्या खुर्चीवर

संतोष भिसेसांगली : बेडग (ता. मिरज ) येथील डॉ. श्रीधर रावसाहेब लिंबिकाई याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत तब्बल तीनवेळा दांडी उडाली. एकदा तर अवघ्या तीन गुणांनी यशाने हुलकावणी दिली. पण त्याने पाठपुरावा सोडला नाही. अखेर यशाचा एव्हरेस्ट सर केलाच. नुकतीच त्याची आयकर विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली.स्पर्धा परीक्षेत यशानंतरही नियुक्तीअभावी पुण्यात स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, त्या पार्श्वभूमीवर श्रीधरचा संघर्ष स्पर्धा परीक्षेच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा. बेडगच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणानंतर नागपूरमधील महाविद्यालयातून तो दातांचा डॉक्टर झाला. वडील जीवन प्राधीकरणमध्ये पंप ऑपरेटर होते. श्रीधरने डॉक्टर व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. श्रीधरला मात्र क्लासवन अधिकाऱ्याची लाल दिव्याची गाडी खुणावत होती. डॉक्टर होऊन वडीलांची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याने स्वत:च्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरु केला.२०१४ पासून स्पर्धा परीक्षेच्या मार्गावर वाटचाल सुरु केली. पहिल्याच दणक्यात पूर्वपरीक्षेत दांडी उडाली. पण पुढीलवर्षी मात्र उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षेत मात्र पुन्हा अपयशाने वाकुल्या दाखवल्या. २०१६ हे वर्षदेखील अपयशाचेच ठरले. पण ते यशाची पायाभरणी ठरले. परीक्षेच्या खाचाखोचा, गमक समजले. २०१७ मध्ये पुन्हा जोर लावला. घवघवीत यश मिळवले. मुलाखतही छान झाली, पण गुणांची गोळाबेरीज तीनने कमी पडली. अधिकारीपदाच्या खुर्चीने हुकलावणी दिली.२०१८ साली पुन्हा प्रयत्न केला, पूर्वपरीक्षेत यश मिळवले, मुख्य परीक्षा मात्र निराशा करणारी ठरली. २०१९ मध्ये सहावी म्हणजे शेवटची संधी होती. यावेळी पूर्ण झोकून देऊन अभ्यास केला. रात्रं-दिवस ध्यास घेतला आणि यशाचे एव्हरेस्ट सर झाले. १ जुलैरोजी आयकर विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली. आयकर विभागातील नियुक्तीबद्दल प्रा. रवींद्र फडके, तानाजी ओमासे, रावसाहेब लिंबिकाई, धनचंद्र साळे, जीवनधर लिंबिकाई आदींच्या उपस्थितीत श्रीधरचा सत्कार झाला.डॉक्टरकी थोडक्यात टळली...श्रीधर सांगतात, २०१३ पासूनचा आठ वर्षाचा कालखंड मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारा होता. वडील चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले, तरीही शैक्षणिक कर्जाची जबाबदारी त्यांनी पेलली. अधिकारी होता येत नसेल तर परत येऊन वैद्यकीय प्रॅक्टीस सुरु करावी असा त्यांचा आग्रह होता,. पण माझा निग्रह कायम होता. त्याच्या आधारेच यशाचे शिखर गाठले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाSangliसांगली