शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गदग हत्याकांडप्रकरणी मिरजेतील टोळी जेरबंद, आई-वडिलांच्या खुनासाठी मुलाकडून ६५ लाखांची सुपारी

By अशोक डोंबाळे | Updated: April 23, 2024 18:01 IST

सूत्रधारासह आठ जणांना अटक 

मिरज : कर्नाटकात गदग येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडप्रकरणी सूत्रधारासह आठ जणांना अटक करण्यात आली. यापैकी पाच जण मिरजेतील आहेत. मुलानेच वडील व सावत्र आईला ठार मारण्यासाठी ६५ लाखांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गदग पोलिसांनी मिरजेत पाच संशयितांना ताब्यात घेतले.विनायक बाकळे हा तरुण या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. विनायक याने त्याचे वडील प्रकाश बाकळे व सावत्र आई सुनंदा बाकळे यांना ठार मारण्याची सुपारी गदग येथील फिरोज काझी यास दिली होती. यासाठी काझीने तुरुंगात ओळख झालेल्या मिरजेतील टाेळीची मदत घेतली. टाेळीतील पाच जणांसह ताे बाकळे यांच्या घरात शिरला. हल्ल्यात बाकळे यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्याचा व त्यांच्या मुलीचा बळी गेला. विनायक याचा सावत्र भाऊही मारला गेला.याप्रकरणी फिरोज निसारअहमद काझी (वय २९, रा. राजीव गांधीनगर, गदग), झिशान मेहबूबअली काझी (वय २४, रा. गदग) यांना ताब्यात घेतल्यानंतर मिरजेतील साहील अशफाक काझी (वय १९), सोहेल अशफाक काझी (वय १९), या जुळ्या भावांसह सुलतान जिलानी शेख (वय २३), महेश जगन्नाथ साळोके (वय २१), वाहिद लियाकत बेपारी (वय २१, रा. गुरुवार पेठ, मिरज) यांचा हत्याकांडात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.प्रकाश बाकळे व त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. विनायक हा प्रकाश यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले. मुलगा व वडिलांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू हाेता. विनायकने वडिलांना काहीच सांगता मालमत्ता विकल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे विनायकने आईवडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने फिरोज काझी यास ६५ लाखांची सुपारी दिली. काझीसह मारेकरी बाकळे यांच्या घरात शिरले. त्यांनी बाकळे यांचा दुसरा मुलगा कार्तिक याच्यासह त्याचे लग्न ठरलेली वाग्दत्त वधू व तिच्या आईवडिलांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. यावेळी प्रकाश बाकळे व त्यांची पत्नी सुनंदा घरात वरच्या खोलीत झोपले होते. त्यांनी दरवाजाची कडी लावली होती. हल्लेखाेरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवत दरवाजावर लाथा मारल्या. तोपर्यंत प्रकाश बाकळे यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यामुळे मारेकऱ्यांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी अटक केलेले सुलतान शेख, काझी, बेपारी हे मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकmiraj-acमिरजPoliceपोलिस