समडोळीच्या ढबू मिरची व्यापाऱ्यास आठ लाखांला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST2021-05-05T04:45:31+5:302021-05-05T04:45:31+5:30

सांगली : समडोळी (ता. मिरज) सह परिसरातील शेतकऱ्यांकडून ढबू मिरची घेऊन ती विकणाऱ्या व्यापाऱ्यास एकाने सात लाख ९३ हजार ...

Eight lakh rupees to a chilli trader | समडोळीच्या ढबू मिरची व्यापाऱ्यास आठ लाखांला गंडा

समडोळीच्या ढबू मिरची व्यापाऱ्यास आठ लाखांला गंडा

सांगली : समडोळी (ता. मिरज) सह परिसरातील शेतकऱ्यांकडून ढबू मिरची घेऊन ती विकणाऱ्या व्यापाऱ्यास एकाने सात लाख ९३ हजार १२ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी प्रकाश श्रीपाल चव्हाण (रा. समडोळी) यांनी बेळगाव येथील अझर कादर याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समडोळी येथील फिर्यादी प्रकाश चव्हाण हे समडोळीसह परिसरातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ढबू मिरची घेऊन ते बेळगाव येथील ग्रीन व्हेजिटेबल कंपनीस देत होते. १० एप्रिल २०१९ ते १९ ऑगस्ट २०१९ कालावधीत हा प्रकार घडला आहे. या भागातील एकूण १४९ टन ९८५ किलो मिरची त्यांनी या कंपनीस दिली आहे. या मालाचे एकूण बिल ४४ लाख ८१ हजार ५१२ रुपये झाले होते. संशयिताने यातील ३३ लाख ८८ हजार ५०० रुपये फिर्यादीला दिले आहेत; मात्र उर्वरित सात लाख ९३ हजार १२ रुपये देण्यास तो टाळाटाळ करत होता. संशयिताकडे पैशाची मागणी केल्यानंतर तो नकार देत असल्याने अखेर चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलिसात संशयिताविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Eight lakh rupees to a chilli trader