सांगलीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छाप्यात आठजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST2021-05-12T04:28:15+5:302021-05-12T04:28:15+5:30

सांगली : विश्रामबाग पोलिसांनी तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

Eight arrested in raid on Tinpani gambling den in Sangli | सांगलीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छाप्यात आठजणांना अटक

सांगलीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छाप्यात आठजणांना अटक

सांगली : विश्रामबाग पोलिसांनी तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाटील मळ्यातील कुंतीनाथ श्यामराव पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात जुगार अड्डा सुरू होता.

संशयित असे : संजय कुमगोंडा पाटील (वय ५०), सुशांत जयकुमार चौगुले (४२), शुभम शांतीनाथ पाटील (२६), नीलेश अण्णासाहेब पाटील (३४), राहुल संजय वठारे (३५), राकेश संजय वठारे (३५), सचिन सुधाकर आवटी (४२), संदीप रामगोंडा पाटील (३२, सर्व रा. इनामधामणी), प्रदीप जनगोंडा पाटील (४५, नेमिनाथनगर, सांगली). सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, कर्मचारी विलास मुंढे, सर्जेराव पवार, मिथुन गंगधर, सुदर्शन पाटील, जयसिंग अहिरे, जावेद अत्तार यांनी गस्तीदरम्यान ही कारवाई केली. गोठ्यामध्ये आठजण जुगार खेळताना रंगेहात सापडले. त्यांच्याकडून दहा हजारांची रोकड, सहा दुचाकी असा तीन लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Eight arrested in raid on Tinpani gambling den in Sangli