शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

राज्यात दंगली घडवून निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचे प्रयत्न, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

By संतोष भिसे | Updated: August 17, 2023 19:35 IST

सरकारला बहुमत असूनही आत्मविश्वास नाही

सांगली : राज्यात दंगली घडवून निवडणुकीचे वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. सत्तेसाठी फोडा आणि झोडा कार्यक्रम राबवला जात आहे. आत्मविश्वास नसलेले स्थगिती सरकार सत्तेवर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सांगली बाजार समितीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, सतेज पाटील, विक्रम सावंत, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जितेश कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, २०० आमदार असताना भाजपला फोडाफोडीची गरज काय? असा प्रश्न आहे. सरकारला बहुमत असूनही आत्मविश्वास नाही. आगामी निवडणुकीत अन्य पक्षांच्या सोबतीशिवाय जिंकता येणार नाही अशीच भाजपची भावना झाली आहे. राज्यात इतके मंत्री असतानाही स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला मंत्री मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनीच ध्वजवंदन केले. भाजपकडे गेलेल्यांना `आपण का इकडे आलो`? असे वाटत आहे.

चव्हाण म्हणाले, पावसाने शेज्च्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. फक्त घोषणा होत आहेत. शिक्षकांच्या ७२ हजार जागा रिक्त आहेत. दोन लाख शासकीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, पण भरतीचे नियोजन नाही. परिस्थिती गंभीर आहे.

मराठा आरक्षणासाठी कायदाच हवाचव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दिल्लीत कायदामंत्र्यासोबत बैठका व्हायला हव्यात. ५० टक्के मर्यादा असेपर्यंत आरक्षण मिळणार नाही, हे अजित पवारांनाही माहिती आहे. पण दिशाभूल सुरु आहे. कायदा केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.

आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावेवंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांची मानसिकता महाविकास आघाडीत येण्याची आहे. ते यावेत अशी माझीही व्यक्तिगत इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणेही झाले आहे. निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. बीआरएस पक्षाचे नेते भाजपविरोधात बोलत नाहीत. भाजपला मदत करत आहेत. त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. पैसा खर्च करताहेत, पण परिणाम होणार नाही. संजय शिरसाटांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते दररोज काहीही बोलत असतात.

पोंक्षे, भिडेंची लायकी नाहीचव्हाण म्हणाले, संभाजी भिडे, शरद पोंक्षे यांना महत्व नाही. त्यांची दखल घ्यावी इतकी त्यांची लायकीही नाही. व्यक्तिगत पातळीवरील खालील दर्जाची विधाने सहन करणार नाही. अशी विधाने होत असतील तर सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा