शीतपेयाच्या खपावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:07+5:302021-04-19T04:24:07+5:30

------------------------------ स्वच्छतागृहाचा अभाव कासेगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय ...

Effects on soft drink consumption | शीतपेयाच्या खपावर परिणाम

शीतपेयाच्या खपावर परिणाम

------------------------------

स्वच्छतागृहाचा अभाव

कासेगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे.

-------------

सांडपाण्याची समस्या

खानापुर : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत योग्य ती सुविधा राखली जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे.

----------------------

पाण्याचा अपव्यय

कुपवाड : शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा होत आहे. मात्र, त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. महापालिकेकडून उन्हाळ्यात पाण्याची कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याची बचत करण्याची गरज आहे.

----------------

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

मिरज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र, काही उपद्रवी नागरिकांमुळे तालुक्यात योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली.

-------------------

बळिराजा शेतीच्या मशागतीत गुंतला

शिगाव : ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती वाढत चालल्याने गावात फिरण्यापेक्षा ग्रामस्थ स्वत:ला शेतीच्या कामात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत.

---------------------------

रोपे गेली वाळून

सातारा : जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात बागा तयार केल्या आहेत. या बागेत विविध प्रकारची झाडे लावली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे परिसरात रोपे जळून चालली आहेत. या ठिकाणी पाणी घालण्यासाठी पर्यायी सोय करण्याची मागणी केली जात आहे.

-------------------

रिफ्लेक्टरची मागणी

पेठ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होतो.

Web Title: Effects on soft drink consumption