मिरज पूर्वभागात टोमॅटो, ढबू मिरची लागवड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:51+5:302021-06-04T04:20:51+5:30

मिरज पूर्वभागातील लिंगनूर, बेळंकी, संतोषवाडी, खटाव, सलगरे परिसरातील शेतकरी कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देणारे टोमॅटो व ...

In the eastern part of Miraj, tomatoes and chillies are planted loudly | मिरज पूर्वभागात टोमॅटो, ढबू मिरची लागवड जोरात

मिरज पूर्वभागात टोमॅटो, ढबू मिरची लागवड जोरात

मिरज पूर्वभागातील लिंगनूर, बेळंकी, संतोषवाडी, खटाव, सलगरे परिसरातील शेतकरी कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देणारे टोमॅटो व ढबू मिरचीची लागवण करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी येतील का, मजूर मिळतील का, याचे भविष्य अंधारमय असताना शेतकरी मात्र हजारो रुपये खर्च करून या लागवडीमधून नशीब आजमावू पाहत आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे टोमॅटो, ढबू मिरची लागवडीकडे पाठ फिरवली. पर्यायाने कोरोनाला न घाबरता ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली, त्यांना चांगला भाव मिळाला. सध्या कोरोनामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कुटुंबातील लहान-मोठे सदस्य शेतात काम करताना दिसत आहेत.

चौकट

लागवडीचा खर्च वाढला

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टोमॅटो व ढबूचा लागवडीचा खर्च वाढला आहे. मल्चिंग पेपर, तार, बांबू, मशागत या खर्चात वाढ झाली असून, डिझेलचेही दर वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

कोट

लॉकडाऊनमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत टोमॅटो व ढबूचे क्षेत्र वाढले आहे. लागवडीसाठी वातावरणदेखील पोषक तयार होत आहे. त्यामुळे मशागत व लागवड खर्च वाढला असतानादेखील लागवड केली असून जास्त दर मिळण्याची अपेक्षा आहे.

- नारायण सोनुरे, लिंगनूर, भाजीपाला मार्गदर्शक

फोटो ओळ : मिरज पूर्व भागात टोमॅटो व ढबू लागवड सुरू आहे.

Web Title: In the eastern part of Miraj, tomatoes and chillies are planted loudly