शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय दत्त इंडिया कारखाना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:39 IST

सुनील फराटे : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार

सांगली : दत्त इंडिया कंपनी सांगलीतील वसंतदादा शेतकरी साखर कारखाना चालवत आहेत. या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैध संमत्तीची परवानगी घेतली नाही. या कारखान्यामधून सध्या गंभीर वायू व जलप्रदूषण होत आहे. या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.सुनील फराटे म्हणाले, दत्त इंडिया कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २३ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी परवाना दिला होता. दत्त इंडिया कंपनीकडून नोव्हेंबर २०२४ पासून बेकायदेशीरपणे कारखाना सुरू आहे. सदर उद्योगास महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण महामंडळाकडून संमत्तीचे नूतनीकरण करुन मिळालेले नाही.तसेच सद्या कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न केलेले धोकादायक सांडपाणी सोडत आहे. जवळच्या नैसर्गिक नाल्यात वाहून जात असून कृष्णा नदीत ते मिसळत आहेत. या बेकायदेशीर विसर्जनामुळे संपूर्ण नदीच्या पाण्याची गुणवत्ता प्रभावित झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कारखाना कोणत्याही प्रक्रियेशिवाय राख थेट हवेत सोडत आहे. त्यामुळे गंभीर वायुप्रदूषण होत आहे. याचा आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या, मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.शिवाय त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील शेती पिकांवर, वनस्पतींवर व झाडांवर होत आहे. सदर साखर उद्योगाचे ईटीपी आणि इतर प्रक्रिया प्रकल्प योग्यरीत्या कार्यरत नाहीत. त्यामुळे सदर उद्योग प्रक्रिया न केलेले धोकादायक सांडपाणी परिसरात सोडत आहेत. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, विहीर, बोअरमध्ये दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. कारखान्याने बसवलेल्या वायुप्रदूषण नियंत्रण सिस्टिम असमाधानकारक कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेर पडणाऱ्या राखेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर कारखान्याने ओले स्क्रबर बसविलेले नाही. ते तातडीने बसवण्याची गरज आहे.

उपाययोजना करेपर्यंत कारखाना बंद ठेवासाखर उद्योग वारंवार पर्यावरण प्रदूषित करत आहे आणि संमतीच्या विविध अटी आणि शर्तींचे उल्लंघन करत आहे. पर्यावरणाच्या व नागरिकांच्या आरोग्यासाठी दत्त इंडिया यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच कारखान्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून परवाना नूतनीकरण करण्यात येऊ नये. योग्य उपाययोजना न केल्यास कारखाना बंद करण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणीही सुनील फराटे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेpollutionप्रदूषण