शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:04 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे.

जत : कोणतेही सरकार असले तरी उद्योगपतींना पोसण्याचे काम करत असते. काँग्रेसच्या काळात अंबानींना पोसण्याचे काम झाले होते. या सरकारच्या काळात अदानींना पोसण्याचे काम सुरू असून, बळीराजा हा पोतराज बनला आहे, अशा शब्दांत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.जत येथे एका कार्यक्रमात विलासराव जगताप व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी कार्यक्रमस्थळी हस्या पिकला.विलासराव जगताप म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे. कोणाचेही शोषण झाले नाही एवढे शेतकऱ्यांचे शोषण झाले आहे. उद्योगपती, अभिनेते, सरकारी कर्मचारी यांना कधी आत्महत्या करावी लागत नाही; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे सर्व बदलले पाहिजे.जयंत पाटील म्हणाले, सरकार कोणाचे जरी असले तरी जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असून, जत तालुक्याला हक्काचे पाणी देणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सुभाष पाटील, शुभांगी बन्नेनवर, नाना शिंदे, सिद्धाप्पणा शिरशाड, इरण्णा निडोणी, माणिक बिजर्गी, प्रकाश बिज्जरर्गी, उत्तम शेठचव्हाण, उमेश सावंत, बाळ सावंत, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

विलासराव, अधूनमधून भेटत जावा

माजी मंत्री जयंत पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत अनेक दिवस झाले, विलासराव जगताप भेटलेच नाहीत. कधीतरी अधूनमधून भेटत जावा. पक्ष कुठलाही असला तरी सर्वजण कार्यक्रमाला एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पण विलासराव जगताप चिडतील असे काही कार्यक्रमात बोलायचे नाही, असे सांगताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा