शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना, ग्रामस्थांकडून भारत मातेचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:29 IST

कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व

अण्णा खोतमालगाव : भारत - पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील जवान रूपेश ऊर्फ बाळू शेळके या जवानाने तीन महिन्यांच्या मुलाचा नामकरणाचा सोहळा अर्ध्यावर सोडून घरच्यांचा आशीर्वाद घेत भारताने राबविलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू-काश्मीरला रवाना झाला. कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या जवान रूपेश ऊर्फ बाळू शेळके याच्या देशप्रेमाला सिद्धेवाडीच्या ग्रामस्थांनी सलाम करीत मंडपातील ग्रामस्थांनी भारत मातेच्या घोषणा देत जवान शेळके यांना पाठबळ दिले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दहशतवादाविरोधात ‘सिंदूर’ या नावाने मोहीम उघडली आहे. भारताचे जवान भारत मातेचा नारा देत पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात तुटून पडले आहेत. सध्या दोन देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय जवान सतर्क झाले आहेत. जवानांच्या सुट्या रद्द करताना रजेवर गेलेल्या जवानांनाही परतण्याचे आदेश दिलेले आहेत.गेली १० वर्षे सैन्य दलात कार्यरत असणारे जवान रूपेश ऊर्फ बाळू हे आपल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी एक महिन्याच्या सुटीवर सिद्धेवाडी या मूळ गावी आले होते. गुरुवारी ८ मे रोजी घरी तीन महिन्यांच्या बाळाच्या नामकरणासाठी घरासमोर मंडप घातला होता. पै-पाहुण्यांना व ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. मंडप गर्दीने फुलून गेला होता.वाचा - 'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार

कार्यक्रमासाठी काही कालावधी बाकी असताना रूपेश ऊर्फ बाळू शेळके यांना भ्रमणध्वनीवर जम्मू - काश्मीर येथे कर्तव्यासाठी हजर राहण्याचा आदेश मिळाला. आदेश मिळताच जवान शेळके यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंडपात उपस्थित माता लक्ष्मीबाई शेळके, थोरले बंधू शिक्षक अमोल शेळके यांच्यासह उपस्थित वडीलधारी मंडळींचे दर्शन घेतले.

दोनही मुले, पत्नी रूपाली हिची भेट घेत हसतमुखाने देशसेवेसाठी जम्मू - काश्मीरला रवाना झाले. ‘माझा भाऊ ३ महिन्यांच्या स्वतःच्या बाळाचा बारशाचा कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून देशसेवेसाठी निघून गेला. आम्हा कुटुंबीयांसाठी देशसेवा हाच मोठा कार्यक्रम आहे. माझ्या भावाच्या देशभक्तीचा मला सार्थ अभिमान आहे. - अमोल शेळके (भाऊ) 

माझे पती आमच्या बाळाच्या बारशासाठी सुटीवर आले होते; परंतु अचानक त्यांना तात्काळ हजर होण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाण्याचे दु:ख झाले. मात्र, स्वतःच्या बाळाच्या कार्यक्रमापेक्षा देशसेवा-देशभक्ती महत्त्वाची आहे. - रूपाली रूपेश शेळके (पत्नी)

टॅग्स :SangliसांगलीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान