शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सांगलीत कृष्णा नदीतील मासे मृत, पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटल्याचा दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 12:34 IST

कृष्णा नदीतील प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दुर्गंधीही पसरली आहे.

सांगली- कृष्णा नदीतील प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दुर्गंधीही पसरली आहे. महापालिका, ग्रामपंचायती आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे नदीप्रदुषणाने गंभीर रुप धारण केले आहे. सांगलीत यापूर्वीही अनेकदा नदीतील मासे मृत होण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. पाण्यातील आॅक्सिजन नाहीसा होऊन जलचर प्राण्यांवर परिणाम होत असताना शासकीय यंत्रणा नेहमीच झोपेचे सोंग घेत असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून औपचारिकता म्हणून महापालिका व सांडपाणी सोडणाºया ग्रामपंचायतींना नोटीसा दिल्या जातात. त्यानंतर पुन्हा मंडळ आणि साºयाच शासकीय यंत्रणा प्रदुषणाकडे कानाडोळा करतात. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असते. यात एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी १ कोटी लिटर इतके आहे. त्यामुळे प्रदुषणाचे हे प्रमाण किती भयंकर आहे, याची कल्पना येते. तरीही मंडळ, महापालिका किंवा नदीत सांडपाणी सोडणाºया ग्रामपंचायतींना याचे कोणतेही गांभिर्य नाही. दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून नदीप्रदूषणापोटी महापालिकेला सव्वा कोटीचा दंड केला जातो. गेल्या चार वर्षांपासून हा दंड नित्यनियमाने भरलाही जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही अनेकदा दंडाची कारवाई झाली. एकूण दंडाची रक्कम आजअखेर ५ कोटीच्या घरात गेली आहे. दुसरीकडे प्रदूषण मंडळामार्फत नोटिसाही बजावल्या जात आहेत. महापालिकेकडूनही उत्तरांचा सपाटा सुरूच आहे. एकीकडे नदीप्रदूषणाचा आणि दुसरीकडे कागदी कारवायांचा खेळ जोमात आहे. 

अधिकारी सुटीत व्यस्तएकीकडे कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी पडलेले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुटीच्या आनंदात व्यस्त होते. वास्तविक अशा घटनांवेळी अधिका-यांनी किमान थोडे तरी गांभिर्य दाखवून घटनास्थळी येऊन तातडीने पंचनामा करायला हवा होता, मात्र ते दुपारपर्यंत नदीकडे फिरकलेच नाहीत. 

टॅग्स :Sangliसांगलीpollutionप्रदूषण