दुधोंडीतील कबड्डी लीग अखेर रद्द;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST2020-12-07T04:20:42+5:302020-12-07T04:20:42+5:30
सांगली : दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित केलेली कबड्डी लीग अखेर रद्द करण्यात आली. कबड्डी असोसिएशनची परवानगी ...

दुधोंडीतील कबड्डी लीग अखेर रद्द;
सांगली : दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित केलेली कबड्डी लीग अखेर रद्द करण्यात आली. कबड्डी असोसिएशनची परवानगी न घेता आयोजन केले जात असल्याबद्दल जिल्हा शाखेने पोलिसांत धाव घेतली होती.
सचिव नितीन शिंदे, राज्य उपाध्यक्ष दिनकर पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ घोडके यांनी तक्रारीत म्हटले होते की, बोगस कबड्डी लीगद्वारे खेळाडूंकडून पैसे गोळा करण्याचा उद्योग सुरु आहे. धुळ्यातील एका संस्थेने तिचे आयोजन केले होते, मात्र त्यासाठी असोसिएशनची मान्यता घेतली नव्हती. फसवणुकीची माहिती नसलेल्या काही खेळाडूंनी प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, धुळ्याच्या संघटनेने या चाचणी स्पर्धा आता भोगावती (जि. कोल्हापूर ) येथे बुधवारी (दि. ९) घेण्याचे नियोजन केले आहे. सांगली व कोल्हापुरातील खेळाडूंची एकत्रित चाचणी केली जाणार आहे. मात्र कोल्हापुरातील कबड्डी असोसिएशननेही त्या रोखण्याचे ठरविले आहे.
-------------