बोरगाव येथे उपसरपंचांकडून औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:12+5:302021-05-08T04:26:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील उपसरपंच शकिल मुल्ला हे स्वत:च गावात औषध फवारणी करत ...

बोरगाव येथे उपसरपंचांकडून औषध फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील उपसरपंच शकिल मुल्ला हे स्वत:च गावात औषध फवारणी करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता मोहीम राबवून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बोरगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले होते. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने नियोजन केल्याने कोरोना रोखण्यात बऱ्यापैकी यशही आले आहे.
त्यामुळे गावातील गल्लीबोळात व घराघरांत जाऊन उपसरपंच, सदस्य व कर्मचारी सॅनिटायझर, कीटकनाशक, बीएससी पावडरची फवारणी करत आहेत.
शकिल मुल्ला यांनी ग्रामपंचायत कामगारांना सोबत घेऊन पंचायतीच्या ट्रॅक्टरने गावात औषध फवारणीची मोहीम राबविली. ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरला जर चालक उपलब्ध नसला तर ते स्वत: चालक बनून गावातील जनतेची सेवा करताना दिसत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरातून कैतुक होत आहे.