शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मिरज पूर्वच्या मानगुटीवर दुष्काळ ;म्हैसाळ योजना नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:19 IST

दादा खोत । लोकमत न्यूज नेटवर्क सलगरे : मिरज पूर्व भागामध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. मान्सूनने दगा दिल्याने ...

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागामध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. मान्सूनने दगा दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगामही वाया गेला आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. एकीकडे दुष्काळ येथील बळीराजाच्या मानगुटीवर बसत असताना, म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.म्हैसाळ योजनेचे आवर्तन खरीप हंगामात सुरु केले असते, तर भूजल पातळी स्थिर राहिली असती. खरीप वाया गेल्यानंतर सध्या ही योजना सुरू झाली आहे. योजना सुरु होऊन पंधरा दिवस झाले, तरीही अजून शेतकºयांच्या शेतात पाणी दिसत नाही. मिरज पूर्व भागातील शेतकºयांना पाणी मिळण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे.मिरज पूर्व भागात द्राक्षबागांच्या छाटण्या रखडल्या आहेत. ज्या फळ छाटण्या झाल्या आहेत, त्यांना पाणी नाही. त्यामुळे येथील शेतकºयांची स्थिती बिकट झाली आहे. सलगरे, चाबुकस्वारवाडी भागातील शेतकरी टँकरने पाणी देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी अजूनही मुख्य पाटातच दिसत आहे.त्यातच मिरज तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्याने पूर्व भागावर अन्याय झाला आहे. मिरज पूर्व भागात दुष्काळ नसल्याचे ठरविताना कोणते निकष लावले, हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे. मिरज तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात वेगळी नेसर्गिक स्थिती आहे. याचाही विचार यावेळी झाला नाही. यामुळे शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.पाण्याअभावी जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचेही आर्थिक गणित कोलमडणार आहे. शेतमजुरांचा प्रश्नही गंभीर बनणार आहे.पैसे संकलन : भरणा नाहीचम्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु झाल्यानंतर दोनच दिवसांत चाबुकस्वारवाडीतील ओढाकाठावरील शेतकºयांनी एक लाख रुपये गोळा केले होते. परंतु अजूनही हे पैसे म्हैसाळच्या अधिकाºयांनी भरुन घेतले नाहीत. द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी शेवटचा पर्याय म्हणून टँकरचा आधार घेत आहेत. अधिकाºयांकडे पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता, हा भाग आमच्या विभागात येत नाही, अशी धक्कादायक उत्तरे दिली जात आहेत.