ड्रेसिंग रूम, प्रेक्षागृहातील सर्व नियम धाब्यावर
By Admin | Updated: February 10, 2015 23:55 IST2015-02-10T22:41:31+5:302015-02-10T23:55:34+5:30
साराच संशयकल्लोळ : दीनानाथ, बालगंधर्व आणि भावे नाट्यगृहास प्रशासकीय वरदहस्त

ड्रेसिंग रूम, प्रेक्षागृहातील सर्व नियम धाब्यावर
अविनाश कोळी - सांगली -नियम, सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधड्या उडवित गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यपंढरीतील नाट्यगृहांच्या व्यवस्थापनांनी आणि त्यांच्यावर वरदहस्त असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी प्रेक्षकांची कुचेष्टा चालविली आहे. प्रेक्षागृहामधील आसनव्यवस्थेपासून कलाकारांच्या ड्रेसिंग रुम्सपर्यंतचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. नाट्यगृहाची रचना आणि त्याठिकाणच्या सुविधा याबाबत काही निकष शासनाने घालून दिले आहेत. हे नियम नाट्यपंढरी सांगली व मिरजेत पायदळी तुडविण्यात आले आहेत. नाट्यगृहांमधील आसनव्यवस्था नाट्यगृहांच्या दारिद्र्याचे थेट प्रदर्शन करणाऱ्या ठरत आहेत. ड्रेसिंग रुम्स आणि ग्रीन रुम्सना स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था असावी, असा नियम असताना, तो तोडण्यात आला आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठीचे शौचालय, त्यांच्यासाठीच्या सुविधा आणि सुरक्षेचे उपाय याला ठेंगा दाखविण्यात आला आहे.
या सर्व गोष्टींमुळे सध्या नाट्यगृहांतील प्रेक्षकसंख्या घटत चालल्याचे चित्र आहे.
सर्वांचीच मिलिभगत
नाट्यगृहांकडून नियमांची मोडतोड गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना, शासकीय अधिकाऱ्यांनी कधीच कारवाईचा बडगा उगारला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, करमणूक कर विभाग, महापालिका अग्निशमन कार्यालय, आरोग्य विभाग अशा सर्वच कार्यालयांकडून परवाने लगेच दिले जातात. प्रत्यक्षात नाट्यगृहात येऊन कधीही तपासणी केली जात नाही.
आसन व्यवस्थेचा नियम
नाट्यगृहांमधील खुर्च्या अडीच बाय अडीच अशा आकाराच्या असाव्यात
दोन रांगांमधील अंतर हे किमान दीड फुटाचे असावे
नाट्यगृहातील खुर्च्या पुश-बॅक (मागे-पुढे होणाऱ्या) असाव्यात
खुर्च्यांना चांगले कुशन्स् असावेत
भावे नाट्यगृह उणिवा
अग्निशमनचे वाहन सहजासहजी आत जाण्यासाठी जागाच नाही
खराब, दाटीवाटीची आसनव्यवस्था
ड्रेसिंग रुम्स व ग्रीन रुम्स संयुक्तच
महापालिकेच्या नाट्यगृहांपेक्षा अधिक अस्वच्छता
अत्यंत जुनाट विद्युतयंत्रणा
नाट्यगृहाच्या आतच शौचालय
दीनानाथ नाट्यगृह उणिवा
खराब ध्वनियंत्रणा
आसनव्यवस्था सर्वात खराब
ड्रेसिंग रुम्सना स्वतंत्र शौचालये नाहीत
नाटकांसाठी अयोग्य नाट्यगृह
पाार्किंगसाठी अपुरी जागा
अग्निशमनच्या प्रतिबंधक उपाययोजना तोकड्या
बालगंधर्व नाट्यगृह
पार्किंगला अपुरी जागा
स्वच्छतेबाबत कानाडोळा
अरुंद रस्त्याकडेलाच नाट्यगृह
नाट्यगृहाच्या आतील बाजूस प्रसाधनगृह
विद्युत यंत्रणेत दोष
पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही
स्पॉटलाईटस् जळून खाक