पालिकेची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

By Admin | Updated: December 19, 2014 00:18 IST2014-12-18T23:32:30+5:302014-12-19T00:18:04+5:30

दिग्विजय सूर्यवंशी : न भरलेल्या कराबाबत भूमिका स्पष्ट करा

Draw the financial white paper of the corporation | पालिकेची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

पालिकेची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

सांगली : महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून शहरातील असंख्य विकासकामे थांबली आहेत. १ एप्रिलपूर्वी एलबीटी रद्द करणार असल्याचे सुतोवाच राज्य शासनाने केले आहे. परंतु आतापर्यंत व्यापाऱ्यांनी न भरलेल्या कराबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे, हे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले पाहिजे. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीची वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी महापालिकेने श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत केली.
एलबीटीचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. त्यातच शासनाने एलबीटी रद्दची भूमिका घेतल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती कधी सुधारणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, मनपाची स्थिती डबघाईला आलेली आहे. चर खुदाईकरिता रिलायन्स कंपनीकडून मिळालेल्या पैशातून प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पगार भागविले आहेत.
नगरसेवकांचे मानधन थकित आहे. वर्क आॅर्डरने काढलेली कामेही अद्याप प्रलंबित आहेत. मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय विरोधकांशी चर्चा करुन विभागीय आयुक्तांची आम्ही भेट घेणार आहोत आणि मनपा बरखास्तीची मागणी करणार आहोत.
वास्तविक आतापर्यंत महासभा होणे गरजेचे होते. परंतु आजअखेर महासभा घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दाखविलेली नाही. त्यामुळे महापौरांनी विशेष महासभा घेऊन त्यामध्ये श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी केली. (प्रतिनिधी)


अर्थसंकल्प जाहीर नाही
मागील अर्थसंकल्प देखील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हे सर्वच प्रकार दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीत, असा आरोप दिग्विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केला.

Web Title: Draw the financial white paper of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.