शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील डीपी रस्ते, खुल्या जागांची मोजणी होणार, महापालिका स्थायी समिती सभेत घेण्यात आला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:13 IST

खर्चास मान्यता

सांगली : महापालिका क्षेत्रातील मंजूर नकाशातील नियोजित डी.पी. रस्ते, आरक्षित जागा, झोपडपट्टी क्षेत्र, खुल्या जागा व मिळकतींची मोजणी करून अभिलेख तयार करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या प्रशासकीय स्थायी समिती सभेत घेण्यात आला. त्या कामासाठी येणाऱ्या खर्चासही मान्यता देण्यात आली.प्रशासक तथा आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय स्थायी समिती सभा झाली. महापालिकेच्या विकास आराखड्याचे काम वर्ष २००० मध्ये सुरू झाले. २००५ मध्ये प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला. त्यावरील हरकती व सूचनांचा विचार होऊन २००८ मध्ये हा आराखडा मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला. त्यावर शासनाने २०१२ मध्ये अधिसूचना प्रसिद्ध केली; पण नकाशे प्रसिद्ध केले नाही.त्यानंतर सातत्याने नकाशे मंजूर करण्याची मागणी होत होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी याप्रश्नी विधिमंडळात पाठपुरावा केला होता. अखेर जुलै महिन्याच्या अखेर शासनाने नकाशे मंजूर केले. विकास आराखड्यात नियोजित डीपी रस्ते, आरक्षित जागा, झोपडपट्टी क्षेत्राचा समावेश आहे. तसेच महापालिकेच्या ताब्यातील खुल्या जागा, मिळकती इत्यादींची मोजणी करून अभिलेख तयार केला जाणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता. त्याला सभेत मंजुरी देण्यात आली.चिल्ड्रन पार्क, पाणी व्यवस्थेची निविदा मंजूरसभेत चिल्ड्रन पार्क उद्यान विकसित करण्यासाठी ७४ लाख रुपयांची निविदेलाही मान्यता देण्यात आली. शहरातील पाणी व्यवस्थेसाठी खुदाई, व्हाॅल्व्ह साहित्य वापरून नवीन पाइपलाइन टाकण्याच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या निविदाही मंजूर केली. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी लेखन साहित्य व स्टेशनरीच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. तर प्रशासकीय महासभेत एसटी काॅलनीतील उद्यानाचे साई शिखर उद्यान असे नामकरण करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation to Measure DP Roads, Open Spaces

Web Summary : Sangli Municipal Corporation will measure DP roads, reserved areas, slums, and open spaces. A decision was made at the Standing Committee meeting to prepare records. Tenders for a children's park and water system were also approved.