शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डबल शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्नेहांकिता सांगली मनपाच्या क्रीडाधिकारी, प्रथमच शासनस्तरावरुन थेट नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:09 IST

कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्नेहांकिता वरूटे यांचे मूळ गाव प्रयाग चिखली

सांगली : महापालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल २७ वर्षांनंतर शासनस्तरावरून विशेष बाब म्हणून डबल शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्नेहांकिता वरूटे-कदम यांची नियुक्ती झाली आहे. विशेष बाब म्हणून थेट क्रीडाधिकारी म्हणून नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत.कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्नेहांकिता वरूटे यांचे मूळ गाव प्रयाग चिखली आहे. पॉवरलिफ्टिंग सारख्या ताकदीच्या खेळात स्नेहांकिता यांनी मोठा दबदबा निर्माण केला. जिल्हास्तरापासून ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची लयलूट केली. दहा, वीस नव्हे तर तब्बल ८३ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पदके त्यांनी पटकावली आहेत. सात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदके पटकावली आहेत. न्यूझीलंडमध्ये २००७ ला झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये त्यांनी चार सुवर्णपदके पटकावली. २००७-०८ मध्ये बेंच प्रेस प्रकारात आणि २०११-१२ मध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारातील कामगिरीबद्दल शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू ठरल्या आहेत.