मांजर्डेत दुहेरी खुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:52+5:302021-07-05T04:17:52+5:30
फाेटाे : ०४०७२०२१ अजितकुमार साळुंखे लोकमत न्यूज नेटवर्क मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील बसस्थानक परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर दगडाने ...

मांजर्डेत दुहेरी खुन
फाेटाे : ०४०७२०२१ अजितकुमार साळुंखे
लोकमत न्यूज नेटवर्क
मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील बसस्थानक परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर दगडाने ठेचून दाेघांना खून करण्यात आला. दुहेरी खुनाच्या प्रकाराची माहिती मिळताच रविवारी सकाळी परिसरात खळबळ उडाली. अजितकुमार बाबुराव साळुंखे (वय ४८ रा. मांजर्डे) व तानाजी शिवराम शिंदे (वय ५५ रा. आरवडे, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत. बसस्थानक परिसरात पन्नास फुटाच्या अंतरावर दाेन्ही मृतदेह पडले हाेते.
तानाजी शिंदे व अजितकुमार साळुंखे या दाेघांनाही दारूचे व्यसन आहे. शिंदे गावातच शेती व माेलमजुरी करत. तर अजितकुमार साळुंखे हे पुणे येथे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नाेकरीस हाेते. लॉकडाऊनमुळे ते काही दिवसांपासून गावी आले हाेते. शनिवारी रात्री उशिरा तानाजी शिंदे हे सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान दारूच्या दुकानातून बाहेर पडताना दिसून आले आहेत.
रविवारी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही तरुणांना बस स्थानक चाैकात तानाजी शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला दिसुन आला. त्यांच्या मृतदेहापासुन ५० फुटावर रस्त्याच्या कडेला अजितकुमार साळुंखे यांचाही मृतदेह पडला हाेता. त्यांनी तात्काळ याची माहिती तासगाव पाेलिसांना दिली. दुहेरी खुनाची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी माेठी गर्दी केली. दोघांच्याही अंगावर जखमांचे व्रण आहेत.
पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तविली. दोन्ही मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले दोन मोठे दगड आढळून आले आहेत. डोक्यात जबर मार लागल्यामुळे घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
दरम्यान, रात्री उशिरा पाेलिसांनी मांजर्डे व आरवडे येथील काही जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, उपनिरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, जोतिराम पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या.
अजितकुमार साळुंखे यांच्या पश्चात भाऊ पुतणे असा परिवार आहे. तर तानाजी शिंदे यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे. तासगाव पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
चाैकट
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
दुहेरी खुनाच्या घटनेने तासगाव पाेलिसांची यंत्रणा रविवारी सकाळपासूनच कामाला लागली हाेती. मांजर्डे आरवडे येथे कसून चाैकशी करण्यात येत हाेती. संशयित खून करून मांजर्डे आरवडेच्या दिशेने गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही मृत हे व्यसनाधीन आहेत. कुटुंबीयांनीही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.फाेटाे : ०४०७२०२१ तानाजी शिंदे
फाेटाे : ०४०७२०२१ अजितकुमार साळुंखे
लोकमत न्युज नेटवर्क
मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील बसस्थानक परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर दगडाने ठेचुन दाेघांना खुन करण्यात आला. दुहेरी खुनाच्या प्रकाराची माहिती मिळताच रविवारी सकाळी परिसरात खळबळ उडाली. अजितकुमार बाबुराव साळुंखे (वय ४८ रा. मांजर्डे) व तानाजी शिवराम शिंदे (वय ५५ रा. आरवडे, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत. बसस्थानक परिसरात पन्नास फुटाच्या अंतरावर दाेन्ही मृतदेह पडले हाेते.
तानाजी शिंदे व अजितकुमार साळुंखे या दाेघांनाही दारुचे व्यसन आहे. शिंदे गावातच शेती व माेलमजुरी करत. तर अजितकुमार साळुंखे हे पुणे येथे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नाेकरीस हाेते. लॉकडाऊनमुळे ते काही दिवसांपासून गावी आले हाेते. शनिवारी रात्री उशिरा तानाजी शिंदे हे सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान दारूच्या दुकानातून बाहेर पडताना दिसून आले होते.
रविवारी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही तरुणांना बसस्थानक चाैकात तानाजी शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला दिसून आला. त्यांच्या मृतदेहापासून ५० फुटावर रस्त्याच्या कडेला अजितकुमार साळुंखे यांचाही मृतदेह पडला हाेता. त्यांनी तात्काळ याची माहिती तासगाव पाेलिसांना दिली. दुहेरी खुनाची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी माेठी गर्दी केली. दोघांच्याही अंगावर जखमांचे व्रण आहेत.
पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तविली. दोन्ही मृतदेहांजवळ रक्ताने माखलेले दोन मोठे दगड आढळून आले आहेत. डोक्यात जबर मार लागल्यामुळे घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
दरम्यान, रात्री उशिरा पाेलिसांनी मांजर्डे व आरवडे येथील काही जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, उपनिरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक पंकज पवार, जोतिराम पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या.
अजितकुमार साळुंखे यांच्या पश्चात भाऊ पुतणे असा परिवार आहे. तर तानाजी शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. तासगाव पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
चाैकट
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
दुहेरी खुनाच्या घटनेने तासगाव पाेलिसांची यंत्रणा रविवारी सकाळपासूनच कामाला लागली हाेती. मांजर्डे, आरवडे येथे कसून चाैकशी करण्यात येत हाेती. संशयित खून करून मांजर्डे, आरवडेच्या दिशेने गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही मृत हे व्यसनाधीन आहेत. कुटुंबीयांनीही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.