शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ..अन् जत येथे प्रांत कार्यालयावर काढला गाढव मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:13 IST

जत : जत शहरातून सांगोलाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी याचे रखडलेले व चुकीचे काम तत्काळ दुरुस्त करावे, ...

जत : जत शहरातून सांगोलाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी याचे रखडलेले व चुकीचे काम तत्काळ दुरुस्त करावे, या मागणीसाठी मंगळवारी दलित महासंघ मोहिते गटाचे डॉ. उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली जत प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता खालिद शेख यांना निवेदन देण्यात आले.जत शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ जी जातो. या मार्गावर जत शहरातील विठ्ठलनगर परिसर आहे. या परिसरात राष्ट्रीय महामार्गाने अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. या भागात रस्ते डिव्हाडरचे काम चुकीच्या पद्धतीने केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे नाहीत. झेब्रा क्रॉसिंग नाही. दुभाजक नजीक सिग्नल नाही. दिशादर्शक फलक नाहीत. भागात महामार्गावरील सर्व पथदिवे बंद आहेत. काही पथदिवे खांब उन्मळून पडलेले आहेत. सांगोल्याकडून येणाऱ्या वाहनांना दुभाजक स्पष्ट दिसत नाहीत. नगरपालिका प्रशासनाने सर्व सुविधा द्याव्यात, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेऊन विठ्ठलनगर भागातील समस्या सोडवाव्यात.यावेळी डॉ. उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे, कार्याध्यक्ष नितीन जाधव, तालुकाध्यक्ष नवनाथ पवार, सिद्धेश्वर जाधव, जोकेश आदाटे, अतुल ऐवळे, आनंद कांबळे, आनंद पाथरवट, किरण संकपाळ, अभिनंदन साबळे, वैभव जाधव, लकी पवार, सोहेल पवार, रोहित पवार आदी उपस्थित होते.कामे मार्गी लावणारविठ्ठलनगर परिसरातील समस्या पाहून येत्या आठ दिवसांत राष्ट्रीय महामार्गाचे चुकीचे व रखडलेली सर्व कामे मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन उपअभियंता शेख यांनी उपस्थित आंदोलकांना यावेळी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटagitationआंदोलन