चिखलीत भावाच्या स्मरणार्थ शाळेस देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST2021-04-13T04:25:14+5:302021-04-13T04:25:14+5:30

पुनवत : चिखली (ता. शिराळा) येथील शिक्षक अनिल जुगा शिंदे यांनी आपले दिवंगत भाऊ पांडुरंग जुगा शिंदे यांच्या द्वितीय ...

Donation to the school in memory of Chikhali's brother | चिखलीत भावाच्या स्मरणार्थ शाळेस देणगी

चिखलीत भावाच्या स्मरणार्थ शाळेस देणगी

पुनवत : चिखली (ता. शिराळा) येथील शिक्षक अनिल जुगा शिंदे यांनी आपले दिवंगत भाऊ पांडुरंग जुगा शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ सर्व विधींना फाटा देत जिल्हा परिषद चिखली शाळेस मॉडेल स्कूलला देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

चिखली येथील शिंदे कुटुंबीयांनी कायमच पुरोगामी विचारांची जोपासना केली आहे. अनिल शिंदे हे सध्या ढोलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ही मदत त्यांनी सरपंच राजेंद्रसिंह नाईक यांच्या हस्ते शाळेस सुपूर्द केली. यावेळी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटील, लक्ष्मी पांडुरंग शिंदे, भारती शिंदे, ग्रामसेवक अशोक सोनवणे, मुख्याध्यापिका स्वाती देसाई, शिक्षक राजेंद्र पाटील, सुभद्रा माने, कंत्राटदार संदीप पाटील उपस्थित होते. शिंदे कुटुंबीय यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे.

Web Title: Donation to the school in memory of Chikhali's brother