मिरज कोविड रुग्णालयातील डाॅक्टरांचा राष्ट्र सेवादलातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST2021-06-09T04:32:47+5:302021-06-09T04:32:47+5:30

प्रभारी अधिष्ठाता डाॅ. प्रदीप दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहन व डाॅ. रूपेश शिंदे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ...

Doctors of Miraj Kovid Hospital felicitated by Rashtra Sevadal | मिरज कोविड रुग्णालयातील डाॅक्टरांचा राष्ट्र सेवादलातर्फे सत्कार

मिरज कोविड रुग्णालयातील डाॅक्टरांचा राष्ट्र सेवादलातर्फे सत्कार

प्रभारी अधिष्ठाता डाॅ. प्रदीप दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहन व डाॅ. रूपेश शिंदे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदाशिव मगदूम यांनी स्वागत केले. डाॅ. प्रदीप दीक्षित, डाॅ. शिरीष चव्हाण, डाॅ. रामचंद्र शांत, शीला मनोरकर, पी. डी. कुंडले, दिनकर आदाटे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण कार्यात सक्रिय सहभागी सेवा दलाच्या सैनिकांना सेवाव्रती प्रशस्तिपत्र देण्यात आले. डाॅ. शिरीष चव्हाण, डाॅ. प्रदीप दीक्षित, डाॅ. रूपेश शिंदे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मिलिंद कांबळे, रोहित शिंदे, रमेश हेगाणे, विजयेंद्र हरपनहळी, स्नेहा कोरे, शिवानंद हिप्परगी, आशुतोष देशमुखे, युवराज मगदूम, शोभा मगदूम, अनुपमा हेगाणे, कमल माळी, शिवाजी दुर्गाडे उपस्थित होते. रामलिंग तोडकर यांनी आभार मानले.

Web Title: Doctors of Miraj Kovid Hospital felicitated by Rashtra Sevadal