शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

corona virus-होम क्वारंटाईनमध्ये कसूर नको अन्यथा सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:40 AM

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या  प्रवाशांना निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देहोम क्वारंटाईनमध्ये कसूर नको अन्यथा सक्तीविलगीकरण कक्षात ठेवणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली  : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या  प्रवाशांना निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. जर एखादा प्रवाशी कसूर करत असेल तर त्यांना सक्तीने प्रशासनाने तजवीज केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

118 प्रवाशांना त्यांच्याच घरी निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. त्यांनी निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. याबाबतची आवश्यक ती खबरदारी स्वत: संबंधित व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबाने घ्यावी. या प्रवाशांचे होम क्वारंटाईन परिणामकारक व्हावे यासाठी आरोग्य विभागाबरोबरच पोलीस विभागाचीही मदत घेण्यात येत आहे.करोनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी धार्मिक स्थळांवर धार्मिक पूजा व विधीवत कार्यक्रम करण्यासाठी कोणतीही बंदी नाही पण भाविकांची गर्दी होणार नाही याची व स्वच्छतेबाबतची आवश्यक ती खबरदारी संबंधित ट्रस्टी व संयोजक यांनी घ्यावी, असे स्पष्ट केले.जनावरांचे आठवडा बाजार 31 मार्च पर्यंत बंदकरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जनावरांचे आठवडा बाजार 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही औद्यिगिक आस्थापनांवर बंदी नसल्याचेही स्पष्ट केले.आणखी दोन प्रवाशांचे स्वॅब निगेटिव्हयापूर्वी तपासणी करण्यात आलेल्या 6 प्रवाशांचे घशातील स्वॅब निगेटिव्ह आले असून दिनांक 14 मार्च रोजी ज्या दोन प्रवाशांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यांचा अहवालही निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट करून सद्या दोन प्रवाशी भारती हॉस्पीटल व सिव्हील हॉस्पीटल यामध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक गर्दी टाळा, स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घ्या, असेही नागरिकांना आवाहन केले. उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचे यंत्रणांना सक्त निर्देशकरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगून यामध्ये कसूर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद केल्या असल्या तरी तिथल्या बालकांचे पोषण आहाराचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तरी शिक्षकांनी मुख्यालयी हजर राहून शैक्षणिकपूरक कामे करावीत व आपल्या विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.हॉटेल, लॉज, खाद्य पदार्थ विक्रेते यांनी करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची व घ्यावयाच्या खबरदारीची आवश्यक जनजागृती करावी, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी क्लासेस पूर्णत: बंद राहतील याबाबतही संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट केले.

याबरोबरच प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे पालन सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग