शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

आटपाडीत नाही प्यायला पाणी... आणि म्हणे दीड लाख रोपे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:43 PM

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू आहेत, तिथे वनीकरण विभागाने रोपे विक्री करण्याचे दुकान थाटले आहे! विशेष म्हणजे येथे दीड लाख रोपे विक्री करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.आटपाडीत जानेवारीत १५ टन मक्याचे बियाणे चाºयासाठी वाटप करण्यात आले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता वनीकरण विभाग १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यात म्हणे दीड लाख रोपे लावणार आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे ३७ टॅँकर दररोज १०९ खेपा टाकून लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान कशी-बशी भागवत आहे. १४ गावे व २२८ वाड्या-वस्त्यांवरील ४९७२२ लोकसंख्या दररोज पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहत आहे. २७ छावण्यांमध्ये १८९१२ जनावरे जगण्यासाठी दाखल आहेत.असे असतानाही तालुक्यात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली आहे. खासगी रोपवाटिकेत १५ ते २० रुपयांना मिळणारी रोपे ८ रुपयांना विक्री करून तालुक्यात काम सुरू आहे. दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दारात मंडप ठोकून रोपे विक्रीचे दुकान नव्हे, तर स्टॉल सुरू केला आहे.तालुक्यात पाऊसच नाही, तर लोकांना त्यांच्या शेतात किंवा शासकीय जागेत झाडे लावणे सध्या तरी कठीणच बनले आहे. दि. १ जुलैपासून आजपर्यंत तब्बल ६२ रोपांची विक्री झाली आहे! म्हणजे दररोज ७ ते ८ रोपे विकली जात आहेत. या गतीने रोपे विकली, तर दीड लाख रोपे विकायला १८७५० दिवस म्हणजे ६२५ महिने, म्हणजेच ५२ वर्षे लागतील!वनीकरण नव्हे, पैशाचे कुरण!आटपाडीत दोन वनीकरण विभाग कार्यरत आहेत. ते दरवर्षी लाखोच्या संख्येने कागदोपत्री वृक्ष लागवड करून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात वाढलेली झाडे कुठेच दिसत नाहीत. ते केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सध्या जांभूळ, आवळा, चिंच, सीताफळ, गुलमोहर, गूळभेंडी, शिसव, करंज, काशीद या झाडांची रोपे दिली जात आहेत. यापैकी अनेक वृक्षांची लागवड परंपरेनुसार केली जात नाही.