अंधांच्या सुरावटींनी दिव्यांग दिन ठरला संस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:35+5:302020-12-09T04:22:35+5:30

दिव्यांग दिनानिमित्त मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण स्मृती पाटील, रवींद्र ताटे, विनोद परमशेट्टी यांच्याहस्ते झाले. लोकमत ...

Divyang Din was made memorable by the beginnings of the blind | अंधांच्या सुरावटींनी दिव्यांग दिन ठरला संस्मरणीय

अंधांच्या सुरावटींनी दिव्यांग दिन ठरला संस्मरणीय

दिव्यांग दिनानिमित्त मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण स्मृती पाटील, रवींद्र ताटे, विनोद परमशेट्टी यांच्याहस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला. अनेक दिव्यांगांनी सहभागी होऊन आपापली कला सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

बालगंधर्व नाट्यगृहात दिव्यांगांचा सूरसंगम ऑर्केस्ट्रा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. कलाकार महेश नवाळे यांच्यासह सहकाऱ्यांनी विविध गाण्यांच्या सुरावटींवर दिव्यांग दिन संस्मरणीय केला. यावेळी दिव्यांग दिनानिमित्त स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. निकाल असा : घोषवाक्य - जमीर मुल्ला, संभाजीराव सावंत, प्रथमेश देशपांडे ( सर्व सांगली). निबंध स्पर्धा : प्रियांका शिंगे.

सुजल केंचे, अजिंक्य खोत (सर्व सांगली), कविता : त्रिशला शहा, सुयश पाटील ( दोघेही सांगली), महेश होनप (मिरज).

विजेत्यांना उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. विनोद परमशेट्टी, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, वर्षाराणी जाधव, अमोल जाधव, आशा पाटील, पूर्वा दप्तरदार, युवराज जाधव यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आली.

-------------

Web Title: Divyang Din was made memorable by the beginnings of the blind