शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: जिल्हा परिषदेत पाठिंब्यावरून राष्ट्रवादीमध्ये दुफळी, नेत्यांमध्ये कलगीतुरा

By संतोष भिसे | Updated: March 11, 2026 13:48 IST

संजय पाटील-निशिकांत पाटील आमने-सामने

संतोष भिसेसांगली : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा या विषयावरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यातील मतभेद जाहीर झाल्याने पक्षात उभी फूट पडल्याचे दिसत आहे.पक्षनेते माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख आदी नेते बहुमतासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नेत्यांनी महाविकास आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेतली असली, तरी तसा अधिकृत निर्णय प्रदेशाध्यक्षांना कळविलेला नाही. त्यासाठी मुंबईत बोलविलेल्या बैठकीलाही जिल्ह्यातील नेते गेले नाहीत.यादरम्यान, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे. गट स्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष या नात्याने आवश्यक त्या ठिकाणी माझ्या स्वाक्षरी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे, असा दूरध्वनी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला, त्यामुळे मी स्वत: उपस्थित राहिलो होतो.गटनोंदणीच्या फाइलमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पुरेशी काळजी घेतली. पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून आजअखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी चर्चा होऊनच वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. यापुढेही याच पद्धतीने कार्यवाही करण्याचा निर्णय कायम आहे.

जिल्हाध्यक्षांवर जाहीर टीकासोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गटनेता नोंदणीसाठी सर्वच नेते एकत्र गेले नव्हते. अन्य नेते माध्यमांशी संवाद साधत होते, तेव्हा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत संजय पाटील यांनी त्यांच्याबाबत गंभीर व मतभेद दर्शविणारी वक्तव्ये केली. त्यामुळे पाठिंब्याच्या विषयावरून पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊन पक्षश्रेष्ठी पाठिंब्याविषयी योग्य निर्णय घेतील. त्याचा पदाधिकारी व नवनिर्वाचित सदस्य आदर करतील. - निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटनेता निवडीचा निर्णय सर्वानुमते झाला होता. त्यानंतरही जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी परस्पर जाऊन आमचा बाजार करावा इतकी आम्ही वेडी माणसे नाही आहोत. आम्हाला अध्यक्षपदाची आमची मागणी आहे. त्यानुसार पाठिंब्याचा निर्णय एकत्र बसून घेतला जाईल. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. - संजय पाटील, माजी खासदार

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli NCP split over support in ZP, leaders clash.

Web Summary : NCP in Sangli faces a split over supporting a ZP coalition. District President Nishikant Patil and ex-MP Sanjay Patil publicly disagree, creating division. Senior leaders favor Maha Vikas Aghadi, while Patil seeks party directives.