जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.९० टक्के

By Admin | Updated: May 25, 2016 23:35 IST2016-05-25T22:57:22+5:302016-05-25T23:35:09+5:30

निकालात मुलींनी मारली बाजी : शास्त्र शाखेचा सर्वाधिक निकाल; विशेष प्रावीण्यासह ३,३२६ उत्तीर्ण

District HSC results 87.9% | जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.९० टक्के

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.९० टक्के

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात सांगली जिल्ह्याचा निकाल ८७.९० टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप महाविद्यालयांमधून ३ जूनला दुपारी ३ वाजता होणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण ८३.५५ टक्के, तर मुलींचे प्रमाण ९३.५८ टक्के असे आहे. दरम्यान, आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी बुधवारी दुपारपासून नेट कॅफेवर गर्दी झाली होती.
यावर्षी फेबु्रवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३३ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, तर ३३ हजार ५७१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेस बसले होते. यापैकी विशेष प्रावीण्यासह ३ हजार ३२६, प्रथम श्रेणीत १६ हजार ३३८, तर द्वितीय श्रेणीत २३ हजार २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९४.७८ टक्के , कला शाखेचा निकाल ७८.६२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९०.९९ टक्के लागला आहे.
निकाल पाहण्यासाठी बुधवारी दुपारपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांनी सांगली, मिरज शहरातील नेट कॅफेमध्ये गर्दी केली होती. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
अनेकांनी निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारेच पाहिला. ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे कमी असले तरी, मोबाईलवर निकाल पाहता येत असल्याने तेथील विद्यार्थ्यांची सोय झाली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातील १९ शाळांनी ‘शंभर नंबरी’ शाळा म्हणून बहुमान मिळवला आहे. कोल्हापूर विभागाच्या निकालाचा आढावा घेतला असता, त्यात सांगली जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळविला आहे. (प्रतिनिधी)

शंभर नंबरी शाळा
जिल्ह्यातील १९ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यात श्री. व्ही. लोणारी दादरे गुरूकुल उच्च माध्यमिक विद्यालय, रॉयल महात्मा पब्लिक स्कूल निगडी खुर्द (ता. जत), सोपे ज्युनिअर कॉलेज (जत), अंबिका मंडळ ज्युनिअर कॉलेज (कवठेमहांकाळ), नवकृष्णा व्हॅली ज्यु. कॉलेज (कुपवाड), श्री राजर्षी शाहू महाराज कॉलेज सांगली, जी. एस. कोठारी गुजराथी ज्यु. कॉलेज सांगली, न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेज शिराळा, श्री शिवछत्रपती महाविद्यालय शिराळा, न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज भाळवणी (ता. खानापूर), किर्लोस्कर हायस्कूल व ज्यु. कॉलेज किर्लोस्करवाडी (पलूस), संस्कार गुरूकुल पलूस, गुरूदेव दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव, अ‍ॅड. रावसाहेब रामराव पाटील ज्यु. कॉलेज तासगाव, इस्लामपूर हायस्कूल व कॉलेज (वाळवा), सागर पाटील कॉलेज ढवळी (वाळवा), के. बी. पाटील कॉलेज ऐतवडे (वाळवा), महात्मा गांधी महाविद्यालय इस्लामपूर (वाळवा) या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Web Title: District HSC results 87.9%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.