जिल्हा क्रिकेट संघाची शनिवारी निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:18+5:302021-08-18T04:32:18+5:30

सांगली : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा संघाची निवड चाचणी शनिवार, २१ ऑगस्ट रोजी कृष्णा व्हॅली स्कूल ...

District cricket team selection test on Saturday | जिल्हा क्रिकेट संघाची शनिवारी निवड चाचणी

जिल्हा क्रिकेट संघाची शनिवारी निवड चाचणी

सांगली : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा संघाची निवड चाचणी शनिवार, २१ ऑगस्ट रोजी कृष्णा व्हॅली स्कूल क्रीडांगणावर होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी २१ जिल्हा व पुण्यातील क्लब अशा संघांत इन्व्हिटेशन लीग स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात संभाव्य खेळाडू म्हणून निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी तरुण व होतकरू खेळाडूंसाठी ही मोठी संधी असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन बजाज यांनी केले आहे.

१९ वर्षांखालील संघासाठी ज्या खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००२ नंतर झालेला आहे अशा इच्छुक खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात क्रिकेट साहित्यासह २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कृष्णा व्हॅली ग्राउंड येथे आधार कार्ड, जन्माचा दाखला व २ फोटो घेऊन चाचणीसाठी हजर राहावे, असे कळवण्यात आले आहे.

Web Title: District cricket team selection test on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.