जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी २१ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:15+5:302021-08-18T04:32:15+5:30
सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील मुलांचा जिल्हा संघ निवडण्यासाठी २१ ऑगस्टला कुपवाड येथील कृष्णा व्हॅली शाळेच्या ...

जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी २१ रोजी
सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील मुलांचा जिल्हा संघ निवडण्यासाठी २१ ऑगस्टला कुपवाड येथील कृष्णा व्हॅली शाळेच्या मैदानावर चाचणी होणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी २१ जिल्हा व पुण्यातील क्लब अशा संघात निमंत्रितांच्या लीग स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत होणार आहेत. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी संभाव्य खेळाडू म्हणून निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी तरुण व होतकरू खेळाडूंसाठी ही अतिशय नामी संधी असून, ह्या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा. १९ वर्षांखालील संघासाठी ज्या खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००२ नंतर झालेला आहे, अशा इच्छुक खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात क्रिकेट साहित्यासह २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता कृष्णा व्हॅली क्रीडांगणावर आधारकार्ड, जन्मदाखला व २ फोटो घेऊन चाचणीसाठी हजर राहावे, असे आवाहन बजाज यांनी केले आहे.