शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी चौधरी यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 18:21 IST

Sangli Flood Collcator : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिराळा तालुक्यातील पूरबाधित गांवाना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुक

ठळक मुद्देआरोग्य तपासणी, स्वच्छता व वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करण्याचे आदेश कांदे येथे स्थलांतरीतांना अन्यधान्यांचे वाटप

सांगली: अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिराळा तालुक्यातील पूरबाधित गांवाना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुकसान याची पाहणी करुन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना तालूका प्रशासनाला दिल्या.पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थीतीत तालुका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुर्णत: बाधित झालेले देववाडी तसेच अंशत: बाधित कांदे, सागाव, मांगले व मोराणा नदी काठच्या भागाला भेटी दिल्यामोराणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर प्रवाह बाहेर गेल्यामुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. पूरग्रस्त गावांना भेटी देत असताना व पाहणी करत असताना त्यांनी आरोग्य, स्वच्छता व स्वच्छ पिण्याच्या पाणी पुरवठ्या संदर्भातही दक्षता घेण्याचे निर्देश दिले.कांदे येथे स्थलांतरीतांना अन्यधान्यांचे वाटपमहापूरामूळे अनेकांचे संसार उद्वस्त झाले असून अशा बाधित झालेल्या कुटुंबाना शासनाने तात्काळ स्वरुपात 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 किलो तूर मोफत देण्याचे जाहीर केले आहे. यानूसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कांदे येथे धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये 47 कुटुंबांना 470 किलो गहू, 470 तांदूळ वाटप केले. तूरडाळ उपलब्ध होताच तिचेही वाटप त्वरित करण्यात येणार आहे.यावेळी, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, पोलीस निरिक्षक श्री चिल्लावार, तालुका आरोग्य अधिकारी प्रविण पाटील, संबधित गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली