शिराळ्यात जिल्हा बँकेचा उद्या महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:23+5:302021-01-25T04:28:23+5:30

शिराळा : येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमार्फत २६ जानेवारीला हळदी-कुंकू समारंभ व महिला मेळावा आयोजित केला आहे. ...

District Bank's women's meet in Shirala tomorrow | शिराळ्यात जिल्हा बँकेचा उद्या महिला मेळावा

शिराळ्यात जिल्हा बँकेचा उद्या महिला मेळावा

शिराळा : येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमार्फत २६ जानेवारीला हळदी-कुंकू समारंभ व महिला मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास आमदार मानसिंगराव नाईक, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जयंवतराव कडू-पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

कोरोना महामारीनंतर तालुक्यात हा पहिलाच कार्यक्रम होत असून, सुरक्षित अंतर, प्रत्येकाला मास्क, सॅनिटायझरचा वापर, आदी राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात महिलांना उपस्थितीबद्दल प्रत्येकी भेट वस्तू देण्यात येईल. शिराळा तालुक्यातील महिला, बँकेकडील महिला ठेवीदार, खातेदार, बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्करर्स यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विश्वास उद्योग समूह नगरपंचायत शिराळा, पंचायत समिती शिराळा व लोकनेते फत्तेसिंगसराव नाईक, अप्पा सहकारी दूध संघ यांचे सहकार्य आहे.

Web Title: District Bank's women's meet in Shirala tomorrow