शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

Lok Sabha Election 2019 लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी जिल्हा बॅँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:32 PM

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार हे सांगली जिल्हा बँकेचे संचालक असून, अन्य संचालकांपैकी ९० टक्के संचालक ...

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार हे सांगली जिल्हा बँकेचे संचालक असून, अन्य संचालकांपैकी ९० टक्के संचालक हे या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा बॅँक लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आली आहे.भाजपचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील हे दोघेही जिल्हा बॅँकेचे संचालक आहेत. दोघेही प्रमुख उमेदवार असल्यामुळे जिल्हा बॅँकेचे संचालकही या दोन्ही उमेदवारांमध्ये विभागले गेले आहेत. एक खासदार, दोन आमदार, दोन माजी आमदार, एक जिल्हा परिषद अध्यक्ष अशी दिग्गज राजकीय मंडळी या बॅँकेत आहेत. याशिवाय अन्य संचालकांमध्येही ताकदीचे राजकारणी असल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दिलीपतात्या पाटील हे बॅँकेचे अध्यक्ष व राष्टÑवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघातील प्रचाराची धुरा त्यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे संपूर्ण संचालक मंडळच या ना त्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीशी बांधले गेले आहे.कॉंग्रेस आघाडी आणि भाजप अशा दोन गटात संचालक विभागले गेले आहेत. जिल्हा बँकेतील सत्ताधारी शेतकरी पॅनेलमध्ये सर्वच पक्षांचा भरणा आहे. विरोधी रयत पॅनेलमध्ये बहुतांश कॉंग्रेसचे संचालक आहेत. तरीही लोकसभा निवडणुकीत पॅनेलचा विचार न राहता स्वतंत्र पक्षीय विचार घेऊन संचालक स्वतंत्रपणे वाटचाल करीत आहेत. सध्या बँकेत संचालकांचा वावरही कमी झाला आहे. जे संचालक येतात, त्यांच्यातही राजकीय विषय चर्चेचा बनला आहे. जिल्हाभर वेगवेगळ््या मतदारसंघातून आलेले संचालक त्या त्या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रत्येक संचालकाचे निवडणुकीतील योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याने सातत्याने दोन्ही उमेदवार त्यांच्या गटातील संचालकांशी संपर्कात आहेत. उमेदवारांनी त्यांच्याकडे जबाबदाऱ्याही सोपविल्या आहेत.कोण कोणाकडे आहे...भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे सध्या आ. अनिल बाबर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, चंद्रकांत हाक्के आदी, तर विशाल पाटील यांच्याकडे आ. मोहनराव कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत, गणपती सगरे, प्रा. शिकंदर जमादार, बाळासाहेब होनमोरे आदी संचालक आहेत.अध्यक्ष-उपाध्यक्षही विभागलेजिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात चांगली मैत्री आहे. संचालक मंडळातील संघर्ष पेटला असतानाही हे दोन्ही पदाधिकारी एकमेकांना साथ देत होते. लोकसभा निवडणुकीत दोघेही विभागले गेले आहेत. देशमुख भाजपच्या बाजूने मैदानात असून, दिलीपतात्या पाटील कॉँग्रेस-राष्टÑवादी-स्वाभिमानी आघाडीच्या बाजूने आहेत.महायुतीपेक्षा महाआघाडीचे बाहुबल अधिकजिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात महायुतीपेक्षा आघाडीचे बाहुबल अधिक आहे. एकूण संचालकांपैकी ५७ टक्के संचालक आघाडीकडे, ३८ टक्के महायुतीकडे, तर पाच टक्के म्हणजेच एक संचालक तटस्थ दिसून येतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक