इस्लामपुरात ४० योगसाधकांना योगा मॅटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:15+5:302021-02-20T05:18:15+5:30

इस्लामपूर : येथील ‘स्व’सक्षम फौंडेशनच्यावतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरातील ४० महिलांना योगा मॅटचे मोफत वाटप करण्यात आले. ...

Distribution of yoga mats to 40 yoga seekers in Islampur | इस्लामपुरात ४० योगसाधकांना योगा मॅटचे वाटप

इस्लामपुरात ४० योगसाधकांना योगा मॅटचे वाटप

इस्लामपूर : येथील ‘स्व’सक्षम फौंडेशनच्यावतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरातील ४० महिलांना योगा मॅटचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, योग शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. बी. एस. पाटील, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील उपस्थित होत्या.

वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या एस. डी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय आणि साई गणेश मंडळाच्या सहकार्याने १६ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत चालणारे महिलांसाठीचे योग शिबिर सुरू आहे. महिलांचे जीवन आरोग्यमय व्हावे, या उद्देशाने हे शिबिर सुरू आहे. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष, गुप्त वार्ता विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, उपाध्यक्ष रोहित जाधव, संदीप कदम, दौलत पवार, श्रीकांत पाटील, अनिकेत पाटील, विश्वजित पाटील, विनय पाटील, भूषण महामुनी, अभिजित पाटील, शिवराज पाटील, अनुप वाळवेकर, अमोल माळी, गणेश पाटील, निखिल देसाई, शिवदत्त देसाई, राहुल कुशिरे, पोपट गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Distribution of yoga mats to 40 yoga seekers in Islampur