‘महिला बालकल्याण’तर्फे शिलाई मशीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:33 IST2021-09-07T04:33:03+5:302021-09-07T04:33:03+5:30

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे महिला बालकल्याण विभागाच्या योजनेंतर्गत अथिकदृष्ट्या दुर्बल व इतर मागासवर्गीय दारिद्र्यरेषेखालील महिलांना शिलाई मशीनचे ...

Distribution of sewing machines by 'Mahila Balkalyan' | ‘महिला बालकल्याण’तर्फे शिलाई मशीन वाटप

‘महिला बालकल्याण’तर्फे शिलाई मशीन वाटप

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे महिला बालकल्याण विभागाच्या योजनेंतर्गत अथिकदृष्ट्या दुर्बल व इतर मागासवर्गीय दारिद्र्यरेषेखालील महिलांना शिलाई मशीनचे वाटप लोकनियुक्त सरपंच मिनाक्षी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मिनाक्षी महाडिक म्हणाल्या, महिला अथिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहाेत. यासाठीच्या शासन याेजनांचा लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा.

यावेळी उपसरपंच चंद्रकात पवार, आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील, बेगमबी जमादार, संगीता शेलारे, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण तसेच कर्मचारी उपस्थित हाेते.

फोटो : ०६ पेठ ३

ओळी : पेठ (ता. वाळवा) येथे महिला बालकल्याण योजनेंतर्गत शिलाई मशीनचे वाटप सरपंच मिनाक्षी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, बेगमबी जमादार उपस्थित हाेते.

Web Title: Distribution of sewing machines by 'Mahila Balkalyan'