कुंडलापुरात शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:26+5:302021-07-07T04:32:26+5:30
घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस व डी ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना ...

कुंडलापुरात शालेय साहित्याचे वाटप
घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस व डी ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी गरजूंना सवलतीच्या दरात पिठाच्या चक्क्याही प्रदान करण्यात आल्या. कुंडलापूर सोसायटीचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या हस्ते केक कापून रोहित पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी माणिक बाबर, प्रमोद लिगाडे, दादा जगताप, संदीप महिमकर, संजू पाटील, विलास शिंदे, अरूण पाटील, अनिल शिंदे, वसंत पाटील, सचिन शिंदे, अंकुश सोरटे, अतुल घाडगे, अनिकेत गुरव, विकास सोरटे, अंकुश सोरटे उपस्थित होते.