वाढदिवसाचा खर्च टाळून शिक्षकाकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:50+5:302021-06-04T04:20:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील शिक्षक संग्रामसिंह पवार ...

Distribution of masks, sanitizers by the teacher avoiding the cost of birthdays | वाढदिवसाचा खर्च टाळून शिक्षकाकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळून शिक्षकाकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील शिक्षक संग्रामसिंह पवार यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित अनावश्यक खर्च टाळून कोरोना रुग्णांना अंडी वाटप, आरोग्य कर्मचारी, सुरक्षारक्षक सन्मान, प्रभाग क्रमांक ५ मधील प्रत्येक घराघरात मास्क, सॅनिटायझरचे वाटप व फवारणी करुन सामाजिक बांधिलकी जपली.

दरवर्षी संग्रामसिंह पवार हे आपल्या वाढदिवसानिमित गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, परिसर स्वच्छता असे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र कोराना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, त्यांनी प्रभागामधील प्रत्येकाच्या घरी सॅनिटायझरचे वाटप सुरु केले आहे. यावर्षी त्यांनी प्रत्येक घरात दोन मास्क, सॅनिटायझर बॉटल असे एकूण एक हजार मास्क व ५०० सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप केले. सॅनिटायझरची फवारणीही केली. कोरोना जागृतीविषयक पत्रके वाटून कोरोनाबाबत प्रबोधनही केले.

जिल्हा परिषद शाळा व सागाव हायस्कूल शाळेमध्ये क्वाॅरंटाईन असलेल्या कोरोना रुग्णांना त्यांनी अंड्यांचे वाटप केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. पी. एम. चिवटे, आरोग्यसेवक, सेविका, आशा सेविका, इतर कर्मचारी, गावात चोख सुरक्षा व्यवस्था बजावणारे सुरक्षारक्षक यांचाही त्यांनी सन्मान केला.

यावेळी संग्रामसिंह पवार, अशोक पवार, आशुतोष पवार, अजित कांबळे, तुषार कांबळे, रणजित कांबळे, गौतम कांबळे, विवेक पाटील, अजित शिंदे, रणजित पवार, नितीन पवार, स्वप्नील खोत, सतीश शेवडे, सागर सूर्यगंध, सेनापती कांबळे, समीर सातपुते, आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of masks, sanitizers by the teacher avoiding the cost of birthdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.